Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अंबरनाथ विधानसभा निवडणुकीतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार आणि मनसे पदाधिकारी सुमेध भवार, मनसे पदाधिकाऱ्याची एकाला मारहाण



अंबरनाथ विधानसभा निवडणुकीतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार आणि मनसे पदाधिकारी सुमेध भवार तसेच त्यांच्या अंगरक्षकांनी त्यांच्या संस्थेत पूर्वी काम करणारे सहकारी आणि सध्या राष्ट्रवादी विधानसभा युवक अध्यक्ष नितीन अहिरेकर यांना बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी अंबरनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली आहे. तर उर्वरित गुन्हेगारांचा सीसीटीव्हींच्या आधारे पोलिस शोध घेत आहेत.
हे पण वाचा :- केंद्र सरकारने एनआरसी, सीएए, एनपीआर कायदा आणला आहे, एनआरसी कायदा रद्द करा
अंबरनाथ विधानसभा निवडणुकीच्या काळात भाजपमध्ये अल्पावधीतच नावारूपाला आलेले, परंतु विधानसभेच्या ऐन निवडणुकीत भाजपला सोडचिठ्ठी देत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करत विधानसभा निवडणूक लढवणारे सुमेध भवार वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. अंबरनाथ पश्चिम भागातील बुवापाडा परिसरात राहणारे सचिन अहिरेकर हे विधानसभा निवडणुकीपूर्वी सुमेध भवार यांच्याकडे काम करत होते, मात्र निवडणुकीत अहिरे यांनी भवार यांची नोकरी सोडली. शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास अंबरनाथ पश्चिम भागातील नगरपालिकेसमोर असलेल्या कल्पना हॉटेल येथे सचिन अहिरेकर यांना सुमेध भवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बोलवल्याचा आरोप अहिरेकर यांनी केला. या ठिकाणी झालेल्या बाचाबाचीनंतर सुमेध भवार आणि त्यांच्या सहा अंगरक्षकांनी अहिरेकर यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.
हे पण वाचा : -'आई, माझे आणि बाळु काकाचे काहीच नव्हते, आम्ही फक्त फोनवर बोलत होतो. मात्र, शेजारचे बेंद्रे सरांनी आमचे सार्‍या गावात केले.'
तसेच यावेळी सुमेध भवार, रितेश सिंग आणि रविकांत यांनी लोखंडी स्टॅण्ड आणि दगडासारख्या हत्याराचा वापर करत अहिरेकर यांच्या डोक्यात मारहाण केल्याचा आरोप अहिरेकर यांनी केला आहे. या मारहाणीच्या वेळी अहिरेकर याचा भाऊ नितीन आणि मित्र दीपक धनवडे, धीरज पाटील हे नितीन यांना वाचवण्यासाठी आले असता, त्यांनाही यावेळी मारहाण करण्यात आली. हा सर्व प्रकार कल्पना हॉटेलच्या सीसीटीव्हीत कैद झाला.
हे पण वाचा : - लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार
 या प्रकरणी अहिरेकर यांनी दिलेल्या तक्रारीनंतर अंबरनाथ पोलिस ठाण्यात सुमेध भवार यांच्यासह आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणात सोमवारी दोन आरोपींना अटक करण्यात आली. याबाबत सुमेध भवार यांना विचारले असता, अंबरनाथ पालिका निवडणुकांच्या तोंडावर मला बदनाम करण्यासाठी काही राजकीय विरोधकांकडून हा प्रकार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या प्रकरणी अटकपूर्व जामीन घेऊन आपली बाजू मांडेन, असेही त्यांनी सांगितले.
 हे पण वाचा : -  पुणे: सावत्र बापच गेल्या दोन वर्षापासून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शाळेत हा प्रकार उघडकीस आल्यानंतर दामिनी पथकाच्या महिला मार्शलने शाळेत धाव घेतली.