परभणी जिल्ह्यातून बीड जिल्ह्यातील सिरसाळा जवळ असलेल्या दर्ग्यात नवस फेडण्यासाठी आलेल्या भाविकांच्या टेम्पोला सोनपेठ-सिरसाळा नजीक अपघात झाल्याने या अपघातात टेम्पोतील २९ जण जखमी झाले.
हे पण वाचा :- केंद्र सरकारने एनआरसी, सीएए, एनपीआर कायदा आणला आहे, एनआरसी कायदा रद्द करा
जखमींना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सदरचा अपघात आज सकाळी अकरा वाजता घडला.
याबाबत अधिक असे की, परभणी जिल्ह्यातील झरीबोरी येथील लोक टेम्पो (क्र. एम.एच. २२ ए.ए. १३९) मध्ये बसून बीड जिल्ह्यातील सिरसाळा नजीक असलेल्या एका दर्ग्याला नवस फेडण्यासाठी येत होते. सकाळी अकरा वाजता टेम्पो चालकाचा टेम्पोवरील ताबा सुटला आणि टेम्पो रस्त्याच्या कडेला जावून पलटला. या अपघातात २९ जण जखमी झाले. जखमींमध्ये महिलांसह पुरुषांचा समावेश असून यात मोहसीन सय्यद, जहीर सय्यद,
हे पण वाचा : - पुणे: सावत्र बापच गेल्या दोन वर्षापासून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शाळेत हा प्रकार उघडकीस आल्यानंतर दामिनी पथकाच्या महिला मार्शलने शाळेत धाव घेतली.
सादउल्ला पठाण, रज्जाक पठाण, जे.पी. शर्मा, जहीर शेख, गणी शेख, मुस्कान सय्यद, गौस सय्यद, मोमीन शेख, अहमद शेख, सुल्ताना पठाण, रुबिना सय्यद, नूरजहॉं सय्यद, शबाना दिलावर पठाण, मुमताज खान यांच्यासह अन्य जणांना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
हे पण वाचा : - लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार
