थेट जनतेतून नगराध्यक्षाच्या निवडीला विद्यमान सरकारने ब्रेक लावल्यानंतर आता फडणवीस सरकारच्या आणखी एका दुसर्या निर्णयाला ब्रेक लावण्याचे काम राज्यातील महाविकास आघाडीकडून होत असून आता थेट जनतेतून सरपंचाची निवड होणार नसून पुर्वी प्रमाणे प्रथम सदस्यांची निवड होवून सदस्य सरपंचाची निवड करतील. सदरच्या निर्णयाबाबत लवकरच अद्यादेश मंत्री मंडळासमोर आणणार असल्याचे ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.
हे पण वाचा :- केंद्र सरकारने एनआरसी, सीएए, एनपीआर कायदा आणला आहे, एनआरसी कायदा रद्द करा
राज्यात मागील ग्रामपंचायत निवडणूकीत जनतेतून सरपंचाची निवड झाली होती. पण यावेळेस राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सदरची निवड ही सदस्यातून व्हावी म्हणून थेट जनतेतून सरपंचाची निवड रद्द करणार असल्याचे सांगण्यात येते. यासाठी लवकरात लवकर मंत्री मंडळासमोर अद्यादेश आणण्यात येणार आहे. याअगोदर थेट जनतेतून नगराध्यक्षाच्या निवडीवर रद्दतेचा शिक्का मारल्यानंतर विद्यमान सरकारने सरपंच
हे पण वाचा : - साईबाबा बीडमध्ये हातमागाच्या दुकानात कामाला होते
निवडीकडे आपलं लक्ष केंद्रीत केलं आहे. एका विचारधारेचा सरपंच निवडूण आल्यानंतर सदस्यांची विचारधारा वेगळी असते. दोघांचे विचार जुळत नसल्याने विकास कामांवर त्याचे दुर्गामी परिणाम होतात असं सांगून हसन मुश्रीफ यांनी थेट जनतेतून सरपंचाची निवड रद्द करण्याचा विचार मांडला आहे. विकासाच्या कामावर दुर्गामी
हे पण वाचा : - पुणे: सावत्र बापच गेल्या दोन वर्षापासून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शाळेत हा प्रकार उघडकीस आल्यानंतर दामिनी पथकाच्या महिला मार्शलने शाळेत धाव घेतली.
परिणाम होवू नयेत आणि ग्रामीण भागाचा विकास सर्वांच्या विचाराने व्हावा. त्यात राजकारण होवू नये म्हणून हा निर्णय घेतला जाणार असल्याचे हसन मुश्रीफ यांनी सांगितले. राज्यातील सध्याचे महाविकास आघाडीचे सरकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सर्व सामान्यातील सर्वसामान्य माणसांना विकासाच्या प्रभावात आणू पाहत असून त्यासाठी एकलहाती निर्णय प्रक्रिया न ठेवता सर्वानुमते निर्णय प्रक्रिया ठेवण्याचा उद्देश सरकारचा असल्याचे सांगून याआधीच्या सरकारने एकलहाती निर्णयाला महत्त्व देत लोकशाही संपुष्टात आणण्याचा प्रयास केल्याचा आरोप यावेळी विद्यमान सरकारमधील मंत्र्यांनी करत आता लोकशाही मार्गाने सर्व निर्णय प्रक्रिया होणार असल्याचे सांगितले.
हे पण वाचा : -'आई, माझे आणि बाळु काकाचे काहीच नव्हते, आम्ही फक्त फोनवर बोलत होतो. मात्र, शेजारचे बेंद्रे सरांनी आमचे सार्या गावात केले.'
रिपोर्टर
