कुणासाठी जळतांना स्वत: व्हायचे अंधार,
आंधळ्याला वाट घ्यावी असा दिव्यांचा संसार.
हा ओघ आहे कवितातल्या शब्दांचा
या मनातून त्या मनात पोहोचणारा
एखाद्याच्या मनाला सहजच रुचणारा
तर एखाद्याला हॄदयात खोलवर टोचणारा
ओठाना जे जमत नाही ते फूल बोलतात,
मनातल्या भावना ते रंगामधून तोलतात,
मनातील फुलांना तर मंगल्याचा गंध असतो,
मनापासून प्रेम करण्यात खरचं किती आनंद असतो
आकाशाला टेकतील एवढे लांब हात नाहीत माझे.
चंद्र तारे साठवुन ठेवतील..
एवढे खोल डोळे नाहीत माझे पण..
तु दिलेले प्रेम नेहमी जपुनठेवील…एवढे मोठे ह्रदय मात्र आहे माझे
दोन्ही हात पसरुन मांगतोय ,देवा एक वर दे
संकटांशी या लढण्याचे ,हातात तेवढे बळ दे
तु आलीस जिवनी,रंग माझे बहरूण आले.
धूंद तुझ्या आठवणी,नयनी अश्रु सोडूनी गेले
जपण्यासारखं बरचं काही उद्यासाठी राखून
ठेवलंयं, ह्र्दयाच्या पंखावरती तुझंच नाव कोरुन ठेवलय.
प्रेम कधी नाही विचारत कि माझ्यावर प्रेम
करतेस का तू ? ते फक्त म्हणते माझ संपूर्ण आयुष्यच आहेस तू.
प्रेम कधी नाही विचारत कि का दूर
आहेसतू, ते फक्त म्हणते कि
माझ्याच जवळ आहेस तू.







