माजलगाव :- इंडिया बँकेकडून जास्तीची व्याज आकारणी करून शेतकर्यांची लूट केली जात आहे. ही लूय थांबविण्यात यावी, या मागणीसाठी आज गंगाभीषण थावरे यांच्या नेतृत्वाखाली बँकेसमोर टाळे ठोको आंदोलन करण्यात आले. या वेळी पोलिसांनी थावरे यांना अटक केली.
इंडिया बँक शेतकर्यांच्या हिताचे निर्णय घेण्याऐवजी शेतकर्यांकडून जास्तीची वसुली करत आहे. तसेच बँकेचा कारभार मराठीमधून करावा, अशी सातत्याने मागणी करूनही या मागणीकडे बँक प्रशासन दुर्लक्ष करत आहे. बँकेने आपला कारभार सुधारून शेतकर्यांची पिळवणूक थांबवावी, या मागणीसाठी आज गंगाभीषण थावरे यांच्या नेतृत्वाखाली बँकेवर मोर्चा काढण्यात आला. या वेळी पोलिस प्रशासनाने मध्येच मोर्चा अडवून गंगाभीषण थावरे यांना ताब्यात घेतले. दरम्यान आजच्या देशव्यापी बंदमध्ये शेतकरी संघर्ष समिती सहभागी असल्याचे थावरे यांनी म्हटले.
