माजलगाव :- केेंद्र सरकारने सीएए, एनआरसी हा कायदा आणल्याने या कायद्याच्या विरोधात गेल्या काही दिवसांपासून देशातल्या विविध भागात वेगवेगळ्या पद्धतींचे आंदोलन होत आहेत. बीड येथेही आंदोलन होत असून नित्रूड येथे आज सकाळी गावातून रॅली काढून मानवी साखळी करत कायद्याचा निषेध करण्यात आला. भारत माता की जय, हम क्या चाहते हैं आझादी यासह इतर घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
हे पण वाचा :- Google Maps ला 15 वर्ष पूर्ण, नव्या लोगोसह सुंदर पिचाईंनी दिल्या शुभेच्छा
गेल्या काही दिवसांपासून देशभरातल्या विविध भागात सीएए व एनआरसीच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. बीड येथेही आंदोलन सुरू आहे. माजलगाव तालुक्यातील नित्रुड येथे आज कायद्याच्या निषेधार्थ मानवी साखळी करण्यात आली. यावेळी कॉ.दत्ता डाके, कॉ.सय्यद रज्जाक, संदिपान तेलगड, माजी सरपंच पोपट गायकवाड, जनक तेलगढ, राजाभाऊ पवार, रामा राऊत, पांडुरंग उबाळे, शेख अतिक, शेख चॉंद, शेख अनिस, शेख खलील, शेख अब्दुल रहीम, सय्यद चुनू, शेख रज्जाक, फेरोज बेग, शेख शफिक, अशोक डाके, शेख महेबुब, शेख कलंदर, हाजी सय्यद, सय्यद जीलानी, मुन्ना बेगसह गावातील नागरीक, तरूण, विद्यार्थी आदींची मोठ्या संख्येने उपस्थित होती. यावेळी केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.
हे पण वाचा :- सावधान Real me मोबाइल घेताय तर
