Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

दिल्ली विधानसभा निवडणुकीत ‘आप’ची हॅट्रिक, भाजपाच्या जागेत वाढ






संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीचं चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे. सत्तेत असलेल्या आम आदमी पार्टीला स्पष्ट बहुमत देत दिल्लीकरांनी सत्तेवर बसण्याचा कौल दिल्याचे प्राथमिक कलांमधून दिसत आहे. 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या भाजपानं ही निवडणूक प्रचंड प्रतिष्ठेची केली होती. राष्ट्रावाद विरूद्ध विकास अशी एकदरीत ही निवडणूक लढवली गेली. त्यात दिल्लीकरांनी विकासाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल सलग तिसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील. यासर्वांमध्ये काँग्रेसची कामगिरी निराशाजनक राहिली आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत ‘आप’ पुन्हा सत्तेत येत आहे. या निकालामुळे मुंबईतील ‘आप’ कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आलं आहे. कार्यकर्त्यांनी गाण्यावर ठेका धरत जल्लोष केला.