Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

'केंद्राकडून राज्याला मिळणाऱ्या पैशांमध्ये दिरंगाई होतेय. त्यामुळे अनेक योजना लांबणीवर पडतायत'



“केंद्र सरकारकडून जशी मदत मिळायला हवी, तशी ती मिळालेली नाही. केंद्राकडून राज्याला मिळणाऱ्या पैशांमध्ये दिरंगाई होतेय. त्यामुळे अनेक योजना लांबणीवर पडतायत” अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. “केंद्र सरकार नेमके कोणत्या दिशेने जाऊ इच्छिते हे केंद्राला सुद्धा कळलेले नाही. एकूणच सर्व गोंधळ आहे” असे उद्धव ठाकरे म्हणाले.
   हे पण वाचा :   चौदा लाखांचा गुटखा जप्त; केजमध्ये गुटख्याच्या गोडाऊनवर छापा


‘सामना’ दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी केंद्राच्या कारभारावर टीकेचे आसूड ओढले. केंद्र सरकार राज्याची आर्थिक कोंडी करतेय? या थेट प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी ते काही जाणूनबुजून करताहेत असं मी काही म्हणत नाही असे उत्तर दिले. केंद्राकडून जर का सगळेच्या सगळे पैसे वेळच्या वेळेवर मिळत गेले तर मला शेतकऱ्यांना अधिक पैसे वेळेवर देता येतील असे त्यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे यांच्यानुसार, जीएसटी कर प्रणाली हे केंद्र सरकारचं खुळ आहे. “महाराष्ट्राचे केंद्राकडे पंधरा हजार कोटी तिथे अडकून पडले आहेत. केंद्राकडून राज्याला येणारा जीएसटीचा जो परतावा असतो तो येण्याचा बाकी होता. मी पत्र दिल्यानंतर साधारणतः चार-साडेचार हजार कोटी आपल्या राज्याला मिळाले. आता ही रक्कम आणखी वाढली असेल. केंद्राकडून वेळच्यावेळी पैसे मिळत नसतील तर, मोर्चा काढला गेला पाहिजे. विरोधी पक्ष काढणार आहे का?” असा सवाल उद्धव यांनी केला.
हे पण वाचा : - मराठीतील आघाडीची अभिनेत्री प्राजक्ता माळीविरोधात तिची डिझायनर जान्हवी मनचंदाने मारहाण केल्याप्रकरणी फौजदारी खटला दाखल केला


उद्धव ठाकरेंनी समजावला नाइट लाइफचा अर्थ
“मुंबईतल्या कष्टकरी वर्गाला रात्रीच्यावेळी जेवणासह अन्य सोयी-सुविधा उपलब्ध करुन देणं म्हणजे नाइट लाइफ. मौजमजा, छंद, पब आणि बार असा नाइट लाइफचा अर्थ होत नाही” असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी नाइट लाइफचा अर्थ उलगडून सांगितला.
हे पण वाचा :- केंद्र सरकारने एनआरसी, सीएए हा कायदा आणल्याने या कायद्यामुळे अनेकांना त्याचा त्रास सहन करावा लागणार आहे.
“मुंबईकर हा दिवसासुद्धा कष्ट करतो. तो थकूनभागून उशिरा संध्याकाळी घरी जातो. घरी जाऊन थोडासा विसावून बाहेर पडतो. तोपर्यंत सगळं बंद झालेलं असतं. कुटुंबासमवेत एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला जाणे हे सुद्ध नाइट लाइफमध्ये आहे” असे उद्धव ठाकरे म्हणाले.
हे पण वाचा :- जनगणनेसाठी शिक्षकांच्या मेमधील सुट्ट्या रद्द