अहमदनगर म्हणजे...
✍
पुर्वी अहमदनगरमधुन एक नदी वाहायची. तिचे नाव सिनानदी. तिला पुर्वी मोठमोठे पुर यायचे. जुनी लोकं या पुरांच्या वेगवेगळ्या आठवणी सांगतात. इतिहासकाळात या पुरात रामरायाचे मोठे सैन्य हत्ती, घोडे व बैलगाड्यासह वाहुन गेल्याची इतिहासात नोंद आहे. सिनानदी थेट जेऊरजवळील ससेवाडीच्या महादेव खोरीतून उगम पावुन जेऊरगाव, पिंपळगाव तलाव, वडगाव गुप्ता, नागापुरच्या दगडी पुलाखालुन अशी वाहात सावेडी बोल्हेगाव शिवारातून ताठेमळा, भुतकरवाडी पंपिंगस्टेशन, भिलांचा म्हसनवाटा, बोरूडेमळा, गंधेमळा, सुडकेमळा, लेंडकर मळा, जाधवमळा, वारुळाचा मारूती, बागरोजा, नालेगाव अमरधाम, जुना नेप्तीनाका, आयुर्वेद कॉलेज वनौषधी उद्यान, आगरकरमळा, स्टेशनरोड लोखंडीपुल अशी मळथडी करत फुलसौंदर मळ्यातून वाहात वाकोडीगावा मार्गे पुढे जात असे, चंद्रभागेला म्हणजे भिमानदीस मिळण्यासाठी.
मानव संस्कृती नदीकाठीच बहरली. पुर्वीची मानववस्ती याच नदीकाठी होती. याच नदीकाठी सध्याचा बोरूडेमळा ते स्टेशनरोडचा फुलसौंदर मळा या भागात चाहुराणा या राजाचे राज्य होते, वसती होती. आजही या भागास चाहुराणा खुर्द आणि चाहुराणा बुद्रुक अशी महसुली नावे आहेत पण गावे नाहीत. चाहुराणा खुर्दची पाटील वतनदारी फुलसौंदर यांस तर चाहुराणा बुद्रुकची पाटील वतनदारी चौरे, कोके, सांगळे, निरफराके व गोंधळे या कुटुंबांना होती. नदीकाठी सावेडीगावाजवळ काही जुन्या इमारती होत्या. त्यापैकी मावलाईचा डोह येथे पुर्वी संगमावर चुना आणि विटांचे जुनाट बांधकाम होते. तेथेच मावलाया या स्त्रीदेवता आहेत. तसेच गावाजवळीत कौठीजवळ निजामशाहाकालीन मोडकळीस आलेल्या इमारतीचा चौथारा होता. तेथे पुर्वी भिल्ल कुटुंब रहात होते. गावाच्या पश्चिमेला 'सय्यद बुवा' नावाची कबर आणि चुना दगडातील चौथारा होता. गावालगत दक्षिणेस दगडी वेस आहे व त्याच्यापुढे काही अंतरावर निजामशाही सरदार चंगेझखान याची कबर असलेला घुमट आहे. घुमटापासुन पुर्वेस काही अंतरावर ओढ्याकाठी चुन्या दगडाचे बांधकाम आहे.
मुळचे बोल्हेगाव नदीकाठीच होते. कायमच येणा-या पुरामुळे हे गाव उठवुन पुढे त्याचे पुनर्वसन केले. 'जुने बोल्हेगाव' म्हणून आजही ती जागा अस्तित्वात आहे. पुर्वी तिथे रस्त्याच्या कडेला गावाचा जुना पाण्याचा छोटा आड होता. आज तो अस्तित्वात नाही. पण पांढरी माती असलेले जुने बोल्हेगाव आहे.
सिनानदी सावेडी बोल्हेगाव परिसरातुन वाहात असताना दोन्ही गावच्या स्त्रीया नदीवर कपडे, गोधड्या धुवायला येत असत. त्याकाळी वाळुतस्कर नसल्याने वाळुच्या थापची थाप असत. वाळुवर गोधड्या, कपडे वाळत घातलेले असत. काही गुरे चारणारे नदीवर असत. या गावांतील कोणी मृत झाल्यास येथेच नदीकाठी दहन केले जात. आम्ही लहानमुले दिवसभर नदीत पोहत असु. वाळुत केलेल्या झिरप्यातलेच पाणी प्यायचे अन तिथेच खेळायचे असा दिनक्रम होता.
पोहण्यासाठी बारस्करमळा, मावलाईचा डोह हि आवडती ठिकाणे. लहानमुले बारस्कर मळ्याजवळ असलेल्या खडकाजवळ तर मोठी मुले मावलाईचा डोह येथे पोहत. मावलाईच्या डोहाजवळ मोठ्ठे वळण व खोल पाणी असल्याने तिथे भिती वाटत असे. आम्ही शाळा बुडवुन पोहायला जायचो. पण घरी आल्यावर घरच्यांना बरोबर कळायचे हे पोट्टे पोहून आले. मग फटके पडत असतं. पण आम्हाला कळत नव्हते की घरच्यांना हे कसे काय कळले?
दिवसभर पाण्यात पोहल्यावर डोळे लाल होत असत. पाण्यामुळे केस वेगळेच राठ होत असत. त्यावर आयडीया काढली पोहल्यावर लगेच घरी जायचे नाही. केस निट करायचे. डोळे लाल कमी होण्याची वाट पहायची नंतर घरी जायचे तोपर्यंत दोन आंब्यांखाली सुरपारंब्या खेळत बसायचे, मोहळ काढत रानावनात बोंबलत फिरायचे. तरीही घरच्यांना पोहल्याचे कळत असे व फटके पडत असत.
आपण पोहलो हे घरच्यांना कसे कळत असे हे एक रहस्यच होते. आम्हाला वाटायचे गावातील कोणी सांगते की काय. तर तसेही नसे. खुप दिवस हे रहस्य समजले नाही.
पण एक दिवस लक्षात आले की आपल्या कंबरेचा करदुरा घात करत आहे. आपण पोहुन आल्यावर घरचे गप्पागप्पात करदुरा चेक करत होते.
करदु-याचा घातकीपणा लक्षात आल्यावर आम्ही करदुरे ताडून टाकत असु व घरचे पुन्हा नवा करदुरा बांधत असत. पण पोहणे व फटके बरीच वर्षे सुरू होते.
थोडे मोठे झाल्यावर पोहण्याची प्रगती झाली होती. नदीतून आता विहीरीत पोहणे सुरू झाले होते. नदीकडेलाच वाकानात 'फुला-याची' एक छोटी विहीर होती आणि काही अंतरावर ओढ्याच्या कडेला 'पडोळ्याची' विहीर होती. तिथे मोठी डेअरिंगबाज मुले पोहत असत. आम्ही ही तिथे जात असु. मुटका मारुन पाणी थेट विहीरी बाहेर काढणे, सुर मारणे, विहीरीचा तळ गाठुन एखादी वस्तु बाहेर काढणे, शिवनापाणी आणि नविन शिकणा-या मुलांना बुडवणे हे खेळ विहीरीत चालत असत.
या विहीरींचे पाणी कमी झाल्यावर आम्ही ताठे मळ्यातील 'बामनाच्या विहीरीत' बरीच वर्षे पोहलो. सावेडीच्या घुमटाजवळील वाकळेमळा आणि वाघमळ्याच्या बांधावरून बामनाच्या विहीरकडे जावे लागत होते. दोन्ही ही मालक बांधावरून जाणारांचा सत्कार करत असत तरीही आम्ही पोहण्यासाठी तो सत्कार सहन करत लपत लपत गुपचुप येथुन जात असु. हि दगडी बांधनीची विहीर ओढ्याकडेलाच होती. शेजारी कडुनिंबाचे झाड होते. थेट त्या निंबाच्या झाडावरून विहीरीत मुटके मारून पाणी बाहेर काढण्याची मजा काही औरच होती. तिथेही शिंदेमळा, भुतकरवाडी सावेडी परिसरातील कायम दहाबाराजण पोहायला आलेले असत.
अशीच आणखी एक भारी विहीर म्हणजे बेकरीतील 'राठोडची विहीर'. हि दगडी बांधकामातील विहीर खुप मोठी होती. खाली थांबण्यासाठी थारोळे नसल्याने पोहुन लगेच वर यावे लागत होते. दगडाच्या कपा-या कपा-यांमधे हात घालत वर यावे लागायचे. गावातील जवळ जवळ सर्वच मुले या विहीरीत पोहत होती. इंजिनघर असलेली ही एकमेव विहीर होती. या विहीरीत शेळके नावाच्या इसमाने आत्महत्या केल्यामुळे येथे पोहणारे एकदम कमी झाले होते. डेरिंगबाज मुले तरही तिथे पोहायला जात.
भिस्तबाग शिवारातील बारस्कर मळ्यातील 'सुभाषची विहीर' नविन पोहणारांसाठी वरदानच होती. खुप खोल नसलेली. मोठा परिघ असलेली आणि थेट वरपर्यंत पाणी असलेली. नविन पोहणारांसाठी ऊत्तम विहीर होती. विहीरीचा मालक सुभाष शेतीतील कामे करत दिवसभर तिथे पोहत असायचा. कोणी पोहायला आले की तोही त्यांच्यासोबत मुटका टाकणारच. मी पाहिलेला नविन शिकणारांना प्रोत्साहन देणारा एकमेव विहीर मालक. शेजारीच नविन आठरे पाटील पब्लिक स्कुल सुरू झाले होते. तिला पत्र्याची शाळा म्हणत असत. तेथीही मुले शाळेला दांडी मारून, होस्टेल बुडवुन सुभाषच्या विहीरीत पोहायला येत असत. आमच्यासह सावेडीतील सर्वजण त्या विहीरीत पोहलेले आहेत.
अशीच सावेडी गावाच्या उत्तरेला पाय-या पाय-यांची 'लक्ष्मीआईची बारव' होती. काठावर लक्ष्मीआईचे पुर्वमुखी छोटेखानी मंदिर मंदिरालगत मोठ्ठे चिंचेचे झाड. बाजुलाच पिंपळाचे व बोरीचे मोठे झाड होते. भिलवाडीतील सर्वजण चिल्यापिल्यांसह दिवसभर बारव व चिंचाजवळीत सावलीत असत. तिला 'यदामामाची बारव' असेही म्हणत कारण आखाडात म्हणजे आषाढ महिन्यात 'यदामामाची जत्रा' या बारवेजवळ होत होती. गावातुन वाजतगाजत हि मिरवणुक निघुन तिचा शेवट या बारवेत व्हायचा. शेकडो लोकांच्या साक्षीने पोतराजांच्या डफड्या वाद्यांच्या गजरात, आसुडांच्या आवाजात, कुंका हळदीच्या सुगंधात, कडुनिंबाचा पालेरा कंबरेला बांधलेला, गळ्यात आसुड घेतलेला, अंगात लक्ष्मीआई आलेला यदामामा या बारवेत पाय-या पाय-यांनी खाली पाण्यात जात कोंबड्याचे नरडे आपल्या दाताने तोडून बळी द्यायचा. नंतर यदामामा सर्वांना मटनाचे गावजेवण द्यायचा. हि बारव त्यामुळे गुढ वाटायची. येथे पोहण्याची डेअरिंग कधीच झाली नाही. पुर्वी पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने गावातील स्त्रिया या बारवेवर पाणी आणण्यात जात असल्याची आठवण आमची आई सतत सांगत होती.
रेसिडेन्सिअल हायस्कुलला आठवीला गेल्यावर आम्हाला नगरपालिकेच्या स्विमिंग टँक चे आकर्षण होते. तिथे पोहण्यास जायचे म्हणजे पैसे लागणार होते. पैसे तर नसायचे. मग काय काही दिवस पैसे जमवुन, शाळेला दांडी मारून तिथेही पोहण्याचा पराक्रम केला. पैसै देऊन पोहण्याची ती आयुष्यातील पहिली वेळ. पण तिथे भिती वाटायची कारण बरेच जण बुडल्याच्या चर्चा कानी आलेल्या होत्या.
सावेडीच्या १७ नंबर शाळेतून आठवीत आलेला ज्ञानेश्वर तागड नावाचा माझा दोस्त होता. आम्ही त्याच्या सोबत तागडवस्ती येथील ऊसाशेजारील विहीरीत पोहायला जात असु. म्हसोबाजवळील भिस्तबाग महाल, ताडाची झाडे, रोडेमळ्यातील चिंचेची मोठी बाग, पांदीतील हवाखानी, लक्कडमहाल आणि बारस्कर मळ्यातील हस्त बेहस्त महाल. हि सर्व पायाखालील ठिकाणे आणि ढवण, तागड, दातीर, फणसे, बरबडे, भिटे हि हक्काची शाळकरी दोस्त मंडळी होती.
- भैरवनाथ वाकळे, अहमदनगर.
१४ एप्रिल २०२०.
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती.
Source fb
#छोटीप्रेमकहाणी
#सुन्या #छोट्या #बाळ्या #गोट्या #साहेब्या #राजा #दंग्या #बाब्या #पिंट्या #संज्या #विज्या #छोट्या #पाप्या

कॉम्रेड भैरवनाथ वाकळे
#बालपणीची#छोटीप्रेमकहाणी