आज संध्याकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयाने पुणे येथील एनआयव्हीकडे पाठविलेल्या ३१ व्यक्तींच्या घशातील स्त्राव चाचणी अहवाल प्राप्त झाले.
त्यातील ०३ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाल्याने जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या आता 24 झाली आहे.
या बाधित व्यक्तींपैकी ०२ व्यक्ती या आलमगीर (ता. नगर) येथील असून ०१ व्यक्ती नगर शहरातील सर्जेपुरा भागातील.
धक्कादायक म्हणजे काल सापडलेल्या आलमगीर येथील बाधित व्यक्तीच्या संपर्कात या व्यक्ती आल्याने त्यांना कोरोनाची लागण आहे.
या तीन व्यक्ती अनुक्रमे ५४, ४८ आणि २७ वर्ष वयाच्या असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे.
