बीड :- कोरोना व्हायरसने सर्वत्र हाहाकार उडून दिला आहे. अवघा देश दारबंद आहे, कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्य माणसांना रेशनवर धान्य देण्याचे स्पष्ट आदेश आहेत. मात्र बीडचे पुरवठा विभाग रेशन दुकानदारांना धान्य देत नसल्याची ओरड जिल्हाधिकार्यांपर्यंत गेल्यानंतर आज सकाळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी बीड येथील गोडाऊनमध्ये छापा मारला. यावेळी उपस्थित गोडाऊन किपर मुंडे याच्या पायाखालची जमिन सरकली आणि त्याच्या डोळ्यात आश्रु तरळले. दुपारी तीन वाजेपर्यंतही जिल्हाधिकारी सदरील गोडाऊनमध्येच होतेे. या छाप्यात नेमकं काय बाहेर पडणार? चोर कोण? कोपन दुकानदार, गोडाऊन किपर की तहसीलदार हे उघड होणारच आहे. परंतू तत्पुर्वी मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार पन्नास किलोच्या पोत्यामध्ये ४७ ते ४८ किलो माल भरल्याचे सांगण्यात येते. एवढेच नव्हे तर तेथील ईलेक्ट्रॉनिक काट्यामध्ये ५०० ग्रॅमचा घोटाळा जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आला. यापुढे ज्या टेम्पो मध्ये हा माल देण्यात आला त्यालाही तीन कट्टे कमी दिले. जिल्हाधिकारी यांच्या या थेट कारवाईने महसूल विभागाच्या भ्रष्ट अधिकार्यात खळबळ उडाली आहे.
गुरूवारी दुपारी १२ च्या सुमारास जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पुरवठा अधिकारी, तहसीलदार व इतर कर्मचार्याने एमआयडीसी परिसरातील शहरी गोदामवर छापा मारला. त्यावेळी गोदाम धान्याने फुल भरलेले होते. कोरोना संचारबंदी लागल्यानंतर रेशन दुकानांवर धान्यासाठी होणारी गर्दी या गर्दीमुळे जामवबंदीचा भंग विशेष म्हणजे ग्राहक आणि रेशन दुकानदार यांच्यात होणारा वाद अशा तक्रारी वाढल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी शहरातील गोदाम तपासणीसाठी पुढाकार घेतला. त्यानिमित्ताने गुरूवारी दुपारी शहरी गोदाम तपासण्यास सुरूवात झाली. जिल्हाधिकारी यांनी सक्तीचे आदेश देवून गोदामला नोएंट्री केली आणि कसून तपासणी सुरू केली आहे. तब्बल तीन तासापासून ही कारवाई सुरू असून तपासणी दरम्यान गोदामात काय तफावत आढळून आली हे मात्र जिल्हाधिकारी गोदामच्या बाहेर आल्यानंतरच समजू शकेल.
