पुणे : पुण्यात ‘कोरोना’चे काल 90 नवे रुग्ण आढळले. त्यामुळे पुण्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 1 हजार 70 वर गेली आहे. कालच्या दिवसात पुण्यात कोरोनामुळे पाच बळी गेले असून आतापर्यंत 69 जणांना प्राण गमवावे लागले. भवानी पेठेतील रुग्णसंख्या दोनशेच्या पार गेली आहे.
गेल्या तीन दिवसात पुण्यात ‘कोरोना’चे 298 नवीन रुग्ण आढळले आहेत. पुण्यात 842 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत, तर 159 रुग्ण बरे झाले आहेत. पुणे शहरात 25 एप्रिलपर्यंत 1075 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्याची नोंद महापालिकेकडे आहे. पुणे शहरातील एकूण रुग्णांपैकी 1037 रुग्णांचा प्रभागनिहाय आढावा नकाशाच्या माध्यमातून घेण्यात आला आहे.
हेही वाचा : कोरोनाविषयीच्या 'फेक न्यूज'ला आळा घालण्यासाठी WhatsApp मोठा निर्णय
भवानी पेठेतील रुग्णसंख्या एका दिवसात 19 ने वाढली आहे. इथे आता 214 कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत. एकूण चार वॉर्डमध्ये रुग्णसंख्या शंभरीपार गेली आहे.
ढोले पाटील रोड (26 नवे रुग्ण), शिवाजीनगर-घोलेरोड (23), भवानी पेठ (19), वानवडी – रामटेकडी (10) या भागात एका दिवसात मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र औंध – बाणेर, कोथरुड – बावधन, वारजे – कर्वेनगर, सिंहगड रोड इथे एकही नवा रुग्ण सापडला नाही. तर कोंढवा – येवलेवाडी आणि बिबवेवाडीतही प्रत्येकी एकच नवा रुग्ण सापडणं दिलासादायक बाब आहे.
वॉर्ड – ‘कोरोना’ रुग्ण संख्या (कंसात एका दिवसातील वाढ)
कसबा – विश्रामबाग वाडा – 127 (+3)
धनकवडी – सहकारनगर – 55 (+6)
भवानी पेठ – 214 (+19) (Pune Bhawani Peth Corona Patients Update)
बिबवेवाडी – 31 (+1)
ढोले पाटील रोड – 160 (+26)
कोंढवा – येवलेवाडी – 13 (+1)
येरवडा – धानोरी – 110 (+6)
पुण्याबाहेरील – 49 (+5)
औंध – बाणेर – 3 (0)
कोथरुड – बावधन – 1 (0)
वारजे – कर्वेनगर – 9 (0)
सिंहगड रोड – 10 (0)
शिवाजीनगर – घोलेरोड – 133 (+23)
नगर रोड – वडगाव शेरी – 29 (+3)
वानवडी – रामटेकडी – 54 (+10)
हडपसर – मुंढवा – 30 (+2)
