बीड :- लॉकडाऊनच्या कार्यकाळात कौटुंबिक हिंसाचार वाढला असल्याने याबाबत पोलिस प्रशासन दक्ष असून आज केज पोलिसांनी शहरामध्ये अलाऊन्सिंगद्वारे नागरिकांना आवाहन केले की कोणास घरगुती हिंसाराबाबत तक्रार करावयाच्या असतील तर त्यांंनी पोलिसांशी संपर्क साधावा आणि शक्य तो नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन त्रिभूवन यांनी केले आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये कौटुंबिक हिंसाचार मोठ्या प्रमाणावर वाढला असल्याचे समोर आले आहे. ज्यांना तक्रारी करायच्या असतील त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा, अशी मोहिमच केज पोलिसांनी राबविली आहे. पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रदीप त्रिभूवन, शेख मतीन, कादरी यांनी शहरवासियांना अलाऊन्सिंगद्वारे आवाहन केले तसेच नागरिकांनी संचारबंदीचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असेही आवाहन केचे आहे.