Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अहमदनगर ताज्या बात्म्या : नगरसेवकासह १८ जणांचे रिपोर्ट्स निगेटिव्ह !



अहमदनगर : कोरोनाबाधित वृध्दाच्या मृत्यूनंतर त्याची दोन मुले पॉझिटिव्ह निघाली. त्यांच्या संपर्कात आलेल्या १८ व्यक्ती मात्र कोरोनाबाधित नसल्याचे स्पष्ट झाले.
एका नगरसेवकासह १८ जणांना तपासणीसाठी नगर येथे पाठवण्यात आले होते. या सर्वांचा कोरोना चाचणी रिपोर्ट निगेटिव्ह अाल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. युवराज खराडे यांनी सांगितले.
आता या सर्वांना डॉ. आरोळे हाॅस्पिटलमधील विलगीकरण कक्षात ठेवले जाणार आहे. निगेटिव्ह अहवालांमुळे जामखेडकरांना मोठा दिलासा मिळाला.

कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या इतरांनीही स्वतः हून तपासणीसाठी पुढे येण्याचे आवाहन शहरातील मौलाना, तसेच तहसीलदार विशाल नाईकवाडे व पोलिस निरीक्षक प्रभाकर पाटील यांनी शासनाच्या वतीने ध्वनिक्षेपकाद्वारे केले आहे.
संपूर्ण जामखेड शहर हाॅटस्पाॅट आहे. कोरोनाबाधितांचा तो भाग प्रशासनाने पूर्णत: सील करुन नागरिकांना संचारबदी केली आहे.

जाणून घेऊया आजच्या दिवसभरातील ताज्या घडामोडी..

'लॉकडाऊन'मध्ये लग्नाचा बस्ता; अठरा जणांवर गुन्हा
बीड पालीकेने घरपट्टी, पाणीपट्टी पूर्णपणे माफ करावी- पप्पु कागदे
नगरमध्ये बंदोबस्तावरील पोलिसाला डंपरने उडविले!

राज्यातील करोना रुग्णांची संख्या ५६४९