Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

मुस्लीम आहे म्हणून सामान स्वीकारले नाही, नकार देणाऱ्या व्यक्तीला अटक


मुंबई: मुस्लिम असल्याचं कारण सांगत, सामान स्वीकारण्यास नकार देणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आलेली आहे. बरकत पटेल असं या कर्मचाऱ्याचं नाव असून तो मिरा रोडमधील स्थानिक दुकानात सामान घरपोच पोहचवण्याचं काम करतो. सामान स्वीकारण्यास नकार देणाऱ्या व्यक्तीचं नाव गजानन चतुर्वेदी असं असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
या घटनेमध्ये, सकाळी बरकत पटेलला ९ ठिकाणी सामान पोहचवायचं होतं. जया पार्क परिसरात राहणाऱ्या सुप्रिया चतुर्वेदी यांच्याकडे सकाळी ९ वाजून ४० मिनीटांच्या दरम्यान सामान पोहचवण्यासाठी गेला होता. नियमांप्रमाणे बरकत सोसायटीच्या गेटबाहेर चतुर्वेदी यांना सामान देत होता, इतक्यातच सुप्रिया यांचे वडील गजानन यांनी आपल्या मुलीला सामान घेण्यापासून थांबवलं. बरकतने या प्रकरणाचा व्हिडीओ पोलिसांना दिला आहे. मी आतापर्यंत ज्या-ज्या घरांमध्ये गेलो आहे लोकांनी मला आपुलकी दाखवली आहे. सध्याच्या खडतर काळात आम्ही बाहेर का पडतोय याची अनेकांना जाणीव आहे, मात्र असे प्रकार त्रासदायक असतात, असं बरकत पटेलने म्हटलं आहे.
या व्हिडीओनुसार आरोपीने सर्वात प्रथम बरकतला त्याचं नाव विचारलं. सुप्रिया या सामान स्वीकारण्यास तयार होत्या, तरीही गजानन यांनी आम्ही मुस्लीम व्यक्तीकडून सामान स्वीकारणार नाही असं सांगितलं. “मी त्या क्षणी काहीही बोललो नाही, घडलेला प्रकार मी मोबाईलमध्ये शूट केला आणि पोलिसांना सोपवला, पण माझ्यासाठी हा प्रसंग अपमानास्पद होता.” बरकतने आपली बाजू मांडली.


जाणून घेऊया आजच्या दिवसभरातील ताज्या घडामोडी..

'लॉकडाऊन'मध्ये लग्नाचा बस्ता; अठरा जणांवर गुन्हा
बीड पालीकेने घरपट्टी, पाणीपट्टी पूर्णपणे माफ करावी- पप्पु कागदे
नगरमध्ये बंदोबस्तावरील पोलिसाला डंपरने उडविले!

'मोदी सरकारने इतकी मोठी गफलत कशी केली?'

राज्यातील करोना रुग्णांची संख्या ५६४९

अहमदनगर ताज्या बात्म्या : नगरसेवकासह १८ जणांचे रिपोर्ट्स निगेटिव्ह !

घरगुती तक्रारी असेल तर तात्काळ पोलिसांना कळवा केज पोलिसांची मोहीम