Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

💁‍♂ आजचे राशिभविष्य 18 मे Astrology

 Astrology

1. मेष : मनातील इच्छा पूर्ण होईल. कौटुंबिक खर्चाचा ताळमेळ घालावा. बढतीसाठी प्रयत्न करावेत. मित्रांशी मतभेद संभवतात. 

2. वृषभ : कामाचा आवाका लक्षात घ्यावा. वेळेचे भान ठेवावे. काही बदल अनपेक्षितरीत्या घडून येतील. 

3. मिथुन : मनातील नैराश्य दूर सारावेत. क्षणिक आनंदाने हुरळून जाल. प्रवासात किरकोळ अडचण येवू शकते. 

4. कर्क : कर्तव्यापेक्षा इच्छेला महत्व द्याल. मनातील अरसिकता काढून टाकावी. जोडीदाराच्या शांत स्वभावाने अचंबित व्हाल. 

5. सिंह : मनातील जुनी आकांक्षा पूर्ण होईल. स्त्रियांची मदत मोलाची ठरेल. नवीन ओळखी दृढ होतील.

6. कन्या : हातातील कामात यश येईल. हित शत्रूंचा त्रास कमी होईल. चुगलखोर व्यक्तींपासून सावध राहावे. 

7. तूळ :  क्षुल्लक गोष्टींनी मुलांवर चिडचिड करू नका. खेळाची आवड जोपासता येईल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. 

8. वृश्चिक : घरगुती वातावरण शांततेचे ठेवावे. लहान-सहान गोष्टी फार मनावर घेऊ नका. घरात तुमच्या शब्दाला महत्व दिले जाईल. 

9. धनु : वाहन वेगावर नियंत्रण ठेवा. भावंडांशी मतभेद वाढवू नका. हातापायाला किरकोळ इजा संभवते. 

10. मकर : धार्मिक कामात मन गुंतवावे. बोलतांना शब्द जपून वापरावेत. कौटुंबिक खर्च नव्याने विचारात घ्यावा. 

11. कुंभ : आपल्याच हट्टावर ठाम राहाल. दुचाकी वाहन चालवताना सावधानता बाळगावी. नसते साहस करू नका. 

12. मीन : सामुदायिक गोष्टीत फार लक्ष घालू नका. कामे उगाचच अडकून पडल्यासारखी वाटू शकतात.