लॉकडाऊन 4 नव्या नियमांसह लागू केला जाईल. आम्ही राज्यांकडून घेत असलेल्या सूचनांच्या आधारे लॉकडाऊन 4 साठी घेत आहोत. 18 मे पूर्वी लॉकडाऊन 4 ची माहिती दिली जाईल, असं नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.
मुंबई बातम्या : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलं. लॉकडाऊन वाढणार असल्याचे संकेतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी दिले. लॉकडाऊन 4 नव्या नियमांसह लागू केला जाईल. आम्ही राज्यांकडून घेत असलेल्या सूचनांच्या आधारे लॉकडाऊन 4 साठी घेत आहोत. 18 मे पूर्वी लॉकडाऊन 4 ची माहिती दिली जाईल, असं नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.
मार्च महिन्यापासून पंतप्रधान मोदी यांनी तीन वेळा देशातील जनतेशी संवाद साधला होता. पहिला संवाद हा जनता कर्फ्यूची घोषणा करताना साधला होता. त्यानंतर 24 मार्च रोजी लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्याची घोषणा करताना, मग 14 एप्रिल रोजी लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा करताना मोदींनी तिसऱ्यांदा देशाला संबोधित केलं होतं. त्यानंतर आज (12 मे) रात्री आठ वाजता पंतप्रधान पुन्हा एकदा देशाला उद्देशून भाषण केलं.
लॉकडाऊनचे तीन टप्पे
पहिला लॉकडाऊन : 25 मार्च ते 14 एप्रिल
दुसरा लॉकडाऊन : 15 एप्रिल ते 3 मे
तिसरा लॉकडाऊन : 4 मे ते 17 मे
4 मे पासून तात्काळ स्वरुपात दोन आठवड्यांसाठी लॉकडाऊन सुरु राहणार असल्याचे गृहमंत्रालयाने म्हटलं होतं. ग्रीन, ऑरेंज आणि रेड झोनमध्ये सरसकटपणे काही सेवा बंदच ठेवण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. तर ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये काही गोष्टींना सुट देण्यात आली होती.
पुढारी अहमदनगर
सार्वमत पेपर अहमदनगर
लोकमंथन पेपर अहमदनगर
नवा मराठा पेपर अहमदनगर
पुण्यनगरी अहमदनगर
सकाळ पेपर अहमदनगर

