सरकारी कर्मचारी CM फंडात देणार एका दिवसाचं वेतन
मुंबई बातम्या:
करोनामुळं आर्थिक संकटात सापडलेल्या राज्य सरकारच्या मदतीला धावून आले आहेत. सर्व सरकारी कर्मचारी मे महिन्यातील एका दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीत देणार आहेत. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेनं हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. करोनाला रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता जवळजवळ सर्वच सेवा ठप्प आहेत.
त्यामुळं राज्याला मिळणाऱ्या महसुलात मोठी घट झाली आहे. सरकारची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. या अडचणीच्या काळात राज्य सरकारी कर्मचारी सरकारच्या मदतीला धावून आले आहेत.
सरकारला आर्थिक मदत हवी म्हणून, राज्यातील सर्व कर्मचारी मे महिन्यातील एका दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीत देणार आहेत. संघटनेच्या वतीने राज्य सरकारला निवेदन देऊन कळवण्यात आले आहे. जवळपास साडेपाच लाख कर्मचाऱ्यांचे अंदाजे ३०० कोटी रुपये या निधीत जमा होणार आहेत.
