कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या नाशिक जिल्ह्यातील मालेगावात एकाच दिवसात तब्बल 51 कोरोना रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
loading...
तर तालुक्यात आतापर्यंत एकूण 428 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण बरे झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगावातून एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण कोरोनामुक्त होत असल्याने आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनाला दिलासा मिळाला आहे.
त्यासोबत मालेगावातील 93 अहवाल आले असून यातील 90 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर 3 अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
मालेगावात आतापर्यंत एकूण 605 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर आतापर्यंत एकूण 33 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
ILOVEBEED वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ilovebeed2019@gmail.com वर