चोपड्याचीवाडी शिवारामध्ये विजेची तार तुटून जनावरांच्या अंगावर पडल्यामुळे यामध्ये दोन जनावरे ठार झाली आहेत. यात संबंधित शेतकर्याचे सव्वा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
loading...
घटनेची माहिती विज वितरण विभागाच्या अधिकार्यांना झाल्यानंतर अधिकार्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला.
विज वितरण कंपनीचा अनागोंदी कारभार नेहमीच चव्हाट्यावर येत आहे. अनेक गावात विजेच्या तारा व्यवस्थीत नसल्यामुळे जीवित हानी होत आहे.
त्यातच जनावरांना धोका होत असून चोपड्याचीवाडी येथे विजेची तार तुटून जनावरांच्या अंगावर पडल्याने यात एक म्हैस आणि एक बैल ठार झाले.
यात शेतकरी सखाराम बाबूराव टेहळे यांचे सव्वा लाख रुपयांचे नुकसान झाले. घटनेची माहिती विज वितरण कंपनीला झाल्यानंतर अधिकार्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला.
दरम्यान, या शेतकर्याला नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जात आहे.