⚡ कोरोनामुळे संपूर्ण जग संकटात सापडले आहे. जगातील प्रत्येक देश यापासून मुक्ती मिळवण्यासाठी युद्धपातळीवर वेगाने संशोधनात अडकला आहे. मात्र, या विषाणूवर अद्याप कोणत्याही प्रकारचे यश मिळाले नाही. सध्या कोरोनावरील महत्वाच्या 8 लसींची वैद्यकीय चाचणी घेतली जात आहे. तर इतर 110 लस संपूर्ण जगभरात विकसीत होण्याच्या विविध टप्प्यात आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) ही माहिती दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जगातील सर्व देश एकजूट होऊन या आजाराचा फैलाव संपवण्याची तयारी करीत आहेत. यामध्ये अमेरिका, चीन आणि जर्मनी या घातक विषाणूला मूळापासून संपवण्यासाठी सुरु असलेल्या मोहिमेचे नेतृत्व करीत आहेत.
सध्याच्या परिस्थितीत अमेरिका आणि चीनसहित इतर अनेक देशांनी लस तयार करण्याच्या तारखाही जाहीर केल्या आहेत. शनिवारी चीनचे आरोग्य अधिकारी झांग वेनहोंग यांनी म्हटले की, “2021 च्या मार्चमध्ये कोरोना विषाणू संपवण्यासाठी लस तयार झालेली असेल. लस तयार करण्यात सध्या मोठी अनिश्चितता आहे.
अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की : “या वर्षाच्या शेवटापर्यंत आपल्याला लस मिळेल.” याचबरोबर जगातील इतरही अनेक देशांच्यावतीनं देखील हाच दावा केला जात आहे की लवकरच लस शोधली जाईल.
ILOVEBEED वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ilovebeed2019@gmail.com वर