Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

होम क्वारंटाईन पापा मोदी पालकमंत्र्यांसोबत!


विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसकडून उमेदवारी मिळविण्यासाठी मुंबईत गेलेले काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष पापा मोदी अंबाजोगाईत परतले तरी होमक्वारंटाईन झालेले नव्हते. 

आज तर ते चक्क पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या दौर्‍यात असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ऊसतोड मजूर, गोर-गरीब लोक पुण्या-मुंबईतून परत आली तर त्यांना 28 दिवस शेतात व गावकुसाबाहेरील शाळेत क्वारंटाईन करण्यात आले. मग हाच न्याय पापा मोदी यांना का नाही? असा प्रश्न विचारला जात आहे.

पापा मोदी व त्यांच्या समवेत मुंबईत गेलेल्या कार्यकर्त्यांना होमक्वारंटाईन करा म्हणून लोकजनशक्ती पार्टीचे राजेश वाहुळे यांनी जिल्हाधिकारी बीड यांच्याकडे 12 मे रोजी तक्रार नोंदविली होती. 
त्या अनुषंगाने अंबाजोगाईचे तहसीलदार संतोष रुईकर यांनी त्याच दिवशी तालुका आरोग्य अधिकारी बाळासाहेब लोमटे यांना पत्राच्या अनुषंगाने कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार लोमटे व त्यांच्या पथकाने पापा मोदी यांना होम क्वारंटाईन होण्याच्या सुचना केल्या होत्या. 

त्यानुसार पापा मोदी यांनी प्रशासनाचे आदेश मानून होम क्वारंटाईन होणं आवश्यक होते. मात्र त्यांनी आज चक्क पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यासमवेत स्वाराति रुग्णालयाची पाहणी केली. याशिवाय मांगवडगाव हत्या प्रकरणातील पीडित कुटुंबियांची देखील पापा मोदी यांनी पालकमंत्र्यांसमवेत भेट घेतली. प्रशासन आणि जिल्ह्याच्या दृष्टीने ही बाब अतिशय गंभीर असून जिल्हा प्रशासनाने याबाबत योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.


ILOVEBEED वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ilovebeed2019@gmail.com वर