करोना संकट: रत्नागिरीत उसळली मुंबईकरांची गर्दी; प्रशासन हतबल
रत्नागिरी: मुंबई, ठाणे परिसरात करोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढू लागल्याने येथून मोठ्या संख्येने लोक गावाकडे निघाले असून रत्नागिरीत गेल्या काही दिवसांत मुंबई परिसरातून येणाऱ्या लोकांची संख्या वाढल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे. अचानक उसळलेल्या या गर्दीने प्रशासनावर मोठा ताण आला असून परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात चालली आहे. याबाबत जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा मुंबई व इतर जिल्ह्यांतून रत्नागिरीत प्रचंड संख्येने येणाऱ्या लोकांमुळे जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे. सध्या जिल्हा रुग्णालयात ४०० करोना पॉझिटिव्ह व १५०० सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर उपचार करण्याची क्षमता आहे. मात्र,राज्यात नवीन करोनाबाधित रुग्णांची नोंद होण्याचा चढता आलेख कायम
दिवसेंदिवस जिल्ह्यात बाहेरून येणाऱ्यांचे प्रमाण वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेची तारांबळ उडाल्याचे चित्र आहे. हे चित्र असेच राहिल्यास व रुग्णालयांतील जागा अपुरी पडल्यास भविष्यात करोना पॉझिटिव्ह रुग्णांना देखील होम क्वारंटाइन करावे लागू शकते, असे सांगितले जात आहे. मुंबईतून येणारे ६० टक्के नागरिक पास घेऊन तर ४० टक्के नागरिक कोणतीही परवानगी न घेता येत आहेत. गंभीर बाब म्हणजे मुंबईतून रत्नागिरी जिल्हा प्रशासनाला कल्पना न देता परस्पर परवानगी दिली गेल्याचेही समोर आले आहे.
शहरातील दुकाने काही नियम व अटींवर सुरू करण्यास परवानगी दिली जाणार असून आता प्रत्येकाने आपापल्या जबाबदारीवर ती उघडायची आहेत. स्वतःची काळजी घेत आता पुढील काळात करोनासोबत जगणे अपरिहार्य आहे, असे जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
