Beed Corona Update
गेवराई तालुक्यातील इटकुर आणि माजलगाव तालुक्यातील हिवरा या गावांसह कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आलेल्याचा परिसरात आरोग्य सर्वे (दि.18) सुरु आहे.
घरनिहाय व्यक्तींचा आता 14 दिवस सर्वे करण्यात येणार आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राधाकिशन पवार यांच्या माहितीनुसार, इटकुर (ता.गेवराई) येथील कंटेन्मेंट झोनमध्ये 7 गावांचा समावेश असून त्याची लोकसंख्या 4 हजार 740 असून त्यामध्ये आज एकूण 1275 घरांचा सर्वे करण्यात आला.
तर हिवरा (ता.माजलगाव) येथील कंटेन्मेंट झोनमध्ये 5 गावांचा समावेश असून त्यांची लोकसंख्या 3 हजार 397 असून त्यामध्ये आज एकूण 695 घरांचा सर्वे करण्यात आला.
एकूण 12 गावातील 1 हजार 670 घरातील 6 हजार 015 व्यक्तींचा आरोग्य सर्वे करण्यात आला आहे
अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राधाकिशन पवार दिली आहे. गावोगाव नागरिक आणि आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्याचे दिसून येत आहे.
ILOVEBEED वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ilovebeed2019@gmail.com वर