कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाउनमुळे मार्चपासून आगारात उभी असणारी लालपरी आता जवळपास दोन महिन्यानंतर गती पकडणार आहे. आजपासून दररोज सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत प्रत्येक आगारातून 12 बस फेऱ्या होणार आहेत.
राज्य शासनाच्या आदेशानुसार नॉन रेड जिल्ह्यात एसटी महामंडळाची सेवा आजपासून (दि.22) सुरू होत आहे. बसच्या एकूण आसन क्षमतेच्या 50 टक्के म्हणजेच 22 प्रवासी महामंडळाच्या बसमधून प्रवास करू शकणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक कालिदास लांडगे यांनी लोकप्रश्नशी बोलताना दिली. गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील एसटी बसेस आगारात उभ्या करण्याची वेळ आली होती.
मात्र आता राज्य शासनाने नुकत्याच घेतलेल्या निर्णयानुसार आज शुक्रवारपासून जिल्हातंर्गत बस सेवा सुरू होत आहेत. बस आसन क्षमतेच्या 50 टक्के म्हणजेच 22 प्रवाशांना बसमधून प्रवास करू शकणार आहेत.