Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

तबलिगीमुळे बाधित झालेले जामखेड कोरोनामुक्त

जामखेड बातम्या
कोरोनाबाधितांमुळे वाढत्या आकड्यामुळे जामखेड हॉटस्पॉट ठरले होते. परदेशी कोरोनाबाधित नागरिक जामखेड शहरात तब्बल दहा दिवस फिरले होते. 

26 मार्चला हा सर्व प्रकार उघडकीस आला जामखेडसह नगर जिल्ह्यात खळबळ उडाली. तबलिगी दोघांसह टप्प्याटप्प्याने 17 जण कोरोनाबाधित रूग्ण जामखेडमध्ये आढळले.
यात य 15 जण स्थानिक कोरोनाबाधित होते.या 15 कोरोनाबाधित नागरिकांपैकी 13 जण  मागील आठवड्यात कोरोनामुक्त झाले आहेत. तर एका वयोवृध्द व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. 

पंधराव्या रूग्णांवर नगरमध्ये उपचार सुरू होते. शनिवारी त्या रूग्णांचे 21 दिवसानंतरचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. काल रविवारी त्या कोरोनामुक्त रूग्णांला डिस्चार्ज मिळाला. त्यामुळे जामखडेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

ILOVEBEED वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ilovebeed2019@gmail.com वर