आष्टीत पुन्हा एकदा कोरोनाचा शिरकाव झाला असून तालुक्यातील सांगवी येथील तब्बल 7 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह निघाली आहेत. आष्टी तालुक्यात हे सारे रुग्ण मुंबईहून आले होते अशी माहिती आहे. यामुळे आता जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा नऊ झाला आहे.
मात्र हे सातही जण नगर जिल्ह्यातील मुळ रहिवाशी असून नातेवाईक म्हणून बीड जिल्ह्यात आले होते. मुंबईहून आलेल्या दोघांना कोरोना झाल्याचे शनिवारी समोर आल्यानंतर आता रविवारी मुंबईहूनच आलेल्या आणखी सात जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या सर्वांचे अहवाल आष्टी तालुक्यातील पाटनसांगवी येथून पाठविण्यात आले होते.
हे नवी मुंबई येथून पिंपळगाव तालुका नगर येथील रहीवाशी असल्याने तेथे आले होते. तर बीड जिल्हा सेफ वाटल्याने आष्टी तालुक्यातील सांगवी येथील सून असल्याचे सांगत यातील काहींना पास मिळवला होता. या सर्वांना 13 तारखेला बीड जिल्हात प्रवेश केला होता.
या घटनेने अता संपूर्ण जिल्हा हादरला असून जिल्हा प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु केल्या आहेत. बीड जिल्ह्यात पुणे, मुंबईकडून आलेल्या लोकांकडूनच मोठ्या प्रमाणावर धोका असल्याचे समोर येऊ लागले असून पॉझिटिव्ह असलेले रुग्ण हे प्रामुख्याने मुंबई पुण्याहून अथवा चोरट्या मार्गाने आलेले आहेत.
ILOVEBEED वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ilovebeed2019@gmail.com वर