Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

मुंबईत दिवसभरात १९ करोनाबळी; ८७५ नवे रुग्ण, एकूण बाधित १३,५६४




मुंबईभोवती करोना विषाणूचा विळखा दिवसागणिक आणखी घट्ट होत आहे.

मुंबई: मुंबईभोवती करोना विषाणूचा विळखा दिवसागणिक आणखी घट्ट होत आहे. आज दिवसभरात १९ करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर ८७५ नवे रुग्ण सापडले आहेत. करोनाबाधितांची एकूण संख्या आता १३, ५६४वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत ५०८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील वाढती करोना रुग्णांची संख्या आरोग्य यंत्रणा, महापालिका आणि राज्य सरकारची चिंता वाढवणारी आहे. मुंबईत आज दिवसभरात १९ रुग्णांचा मृत्यू झाला असून, 

महाराष्ट्र नोकरी जाहिरात 2020

मृतांची एकूण संख्या आता ५०८वर पोहोचली आहे. १९ रुग्णांपैकी १३ रुग्णांना काही अतिजोखमीचे आजार होते. मृतांमध्ये १० पुरुष आणि ९ महिला रुग्ण होत्या. एकाचे वय ४० वर्षांखालील होते. तर पाच जणांचे वय ६० वर्षांवरील होते. तर १३ रुग्णांचे वय ४० ते ६० वर्षांदरम्यान होते. आजारातून आज दिवसभरात २१२ रुग्ण बरे होऊन त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळं आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या ३००४ झाली आहे.