ऑनलाईन दारु आता घरबसल्या दारु खरेदी करता येणार आहे.
राज्यातील मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे (Maharashtra Government on liquor shops). मद्यप्रेमींना आता घरबसल्या दारु खरेदी करता येणार आहे. कारण राज्य सरकारने आता ऑनलाईन दारु विक्रीला परवानगी दिली आहे. त्यामुळे मद्यप्रेमींना घरपोच दारु मिळणार आहे.
मात्र, ही परवानगी फक्त दारु विक्रीचा परवाना असलेल्या दुकानदारांनाच आणि ज्याच्याकडे दारु खरेदीचा परवाना आहे अशा ग्राहकासच देण्यात आली आहे. म्हणजे जो विक्री करतो तो दुकानदार आणि जो खरेदी करतो तो ग्राहक या दोघांकडे परवाना हवा. राज्य सरकारने यासंदर्भात एक परिपत्रक जारी केलं आहे
लॉकडाऊनदरम्यान राज्य सरकारने दारु विक्रीस परवानगी दिली. मात्र, मद्यविक्री दुकांनांबाहेर प्रचंड गर्दी उसळली. त्यामुळे अखेर राज्य सरकारने दारुच्या होम डिलिव्हरीला परवानगी दिली आहे. पण राज्य सरकारने यासाठी काही शर्ती ठेवल्या आहेत.
राज्य सरकारने परिपत्रकात जारी केलेल्या शर्ती
1. परवाना असलेल्या विक्रेत्यांना दारु विक्री करता येणार आहे.
2. दुकानदारांना ऑर्डरशिवाय दारु विक्री करता येणार नाही.
3. परवानाधारक ग्राहकाने ऑर्डर केल्यावरच परवानाधारक विक्रेता दारुची होम डिलिव्हरी करु शकतो.
4. निश्चित दिवशी आणि वेळी दारु घरपोच देता येईल.
5. घरपोच दारु घेऊन जाणाऱ्या व्यक्तीने मास्कचा वापर करावा. त्या व्यक्तीने जवळ सॅनिटायझर ठेवावं आणि वेळोवेळी सॅनिटायझरने हात स्वच्छ करावा.
6. सरकार कधीही हे नियम रद्द करु शकते.
7. जोपर्यंत लॉकडाऊन असेल तोपर्यंत हे नियम पाळणं बंधनकारक असेल.
Sponsored Ad
कानाची श्रवण तपसणी व श्रवण यंत्रावर २० % सुट
वयोव्रधासाठी घर पोहच सुविधा तर आज फोन करा ९६५७ ५८८ ६७७
