Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अहमदनगर ब्रेकिंग न्यूज -तागडवस्तीत खून; पत्ते खेळताना वाद

 पैशाच्या वादातून पाईपलाईन रोडवरील तागडवस्तीत एकाचा खून झाला आहे. पत्ते खेळताना पैशाचा वाद होऊन हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. 

 नंदकिशोर गणपत मंचरे  (52, रा. तागडवस्ती) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून, भरदिवसा घडलेल्या या घटनेने सावेडी परिसरासह शहरात खळबळ उडाली आहे.

लॉकडाऊनमुळे निर्बंध असल्याने विविध माध्यमातून नागरिक आपली करमणूक करून घेतात. पाईपलाईन रोडवरील तागडवस्ती भागात काहीजण आज (शनिवार) दुपारी जांभळीच्या झाडाखाली पत्त्यांचा जुगार खेळत होते. 

या वेळी पैशांच्या कारणावरून वाद निर्माण झाला. वादाचे पर्यवसान हाणामारीत होऊन नंदकुमार मंचरे याला त्याच्या साथीदाराने दगडांने मारहाण केली.

 त्यात तो गंभीर जखमी झाला. उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना त्याचा जागीच मृत्यू झाला.
 दरम्यान, अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील, शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके, तोफखान्याचे पोलिस निरीक्षक हारुण मुलाणी यांच्यासह पथकाने घटनास्थळी भेट दिली.

या प्रकरणी सायंकाळी उशिरा आरोपी सचिन नानासाहेब भोजने (33, रा. तागडवस्ती) याला अटक करण्यात आली असून, जागामालक अशोक भिटे तसेच पत्ते खेळणारे साथीदार अविनाश तागड व दत्तात्रेय साळवे यांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.


ILOVEBEED वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ilovebeed2019@gmail.com वर