पुणे पिंप्री चिंचवड बातम्या
Pimpri chinchwad
पिंपरी-चिंचवड शहरामधील आकुर्डी, चिंचवड स्टेशन, जुनी सांगवी आणि चऱ्होलीतील चार जणांचे कोरोनाचे अहवाल आज (गुरुवारी) रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत.
तर, पुण्यातील गाडीताळ येथील पण वायसीएम रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका महिलेचा अहवालही पॉझिटीव्ह आला आहेत. यामुळे आता रुग्णांचा आकडा ५७ वर पोहचला आहे.
तर, पिंपरी-चिंचवड शहरातील १८३ आणि शहराबाहेरील २० अशा २०३ जणांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे.अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
याबाबत महापालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेने या कोरोना संशयितांचे नमुने एनआयव्हीकडे(नारी) कडे तपासणीसाठी पाठविले होते.
त्यातील काही जणांचे अहवाल आज सकाळी मिळाले. त्यात आकुर्डी, जुनी सांगवी, चऱ्होली आणि चिंचवड स्टेशन येथील चार जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. २८ वर्षीय महिला, २३, ५८, ४० वर्षीय पुरुषांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.