Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

सामाजिक न्याय विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय!

⚡ राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाने अनुसूचित जातीच्या उच्च शिक्षण घेणाऱ्या व गरजू विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता परदेशात उच्चशिक्षण घेण्यासाठी नामांकित विद्यापीठांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या परदेश शिष्यवृत्तीसाठी कौटुंबिक उत्पन्नाची मर्यादा 6 लाख रुपये केली आहे.

💁‍♂️ ही उत्पन्न मर्यादा 8 लाख करण्यासह लाभार्थींची संख्या 75 वरून 200 करण्याचे विचाराधीन असल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.
🎓 *अटीशिवाय लाभ* : यापूर्वी शिष्यवृत्तीसाठी जागतिक क्रमवारी 1 ते 300 पैकी पहिल्या 100 विद्यार्थ्यांना उत्पन्न मर्यादा नव्हती व 101 ते 300 पर्यंत 6 लाख रुपये एवढी उत्पन्न मर्यादा होती. परदेशातील विद्यापीठांमध्ये प्रवेश घेणाऱ्या अनुसूचित जातीच्या 1 ते 100 क्रमवारी असलेल्या विद्यार्थ्यांना कौटुंबिक उत्पन्नाच्या अटीशिवाय लाभ दिला जात होता.

📚 *शिष्यवृत्तीस पात्र* : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या निर्देशानुसार हा शासन निर्णय विभागाकडून घेतला असून आता शिष्यवृत्तीसाठी 1 ते 300 क्रमवारीमध्ये असणाऱ्या व लाभ मिळवण्यासाठी पात्र असलेल्या 75 विद्यार्थ्यांना क्रमवारीनुसार 6 लाखांच्या आत कौटुंबिक उत्पन्न असल्यावरच या शिष्यवृत्तीचा लाभ मिळवता येणार आहे. 

📌 त्यामुळे पदव्युत्तर पदवी व पीएचडीसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या नामांकित विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना आता लाभ मिळणार आहे.

ILOVEBEED वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ilovebeed2019@gmail.com वर