Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

💥 विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या



अंबाजोगाई शहरात अनामिका सुरजित हाजरा (२१) या परप्रांतीय विवाहितेने आज पहाटे आपल्या राहत्या घरी घरातील फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
शहरातील योगेश्वरी मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या ढोरगल्ली कीरायाच्या घरात राहत असलेल्या व प.बंगाल च्या कलकत्ता येथील रहिवासी सुरजित हजरा हा सोन्याचे दागिने बनवणारा कारागीर आपली पत्नी अनामिका सुरजित हाजरा (२१) व एक अडीच वर्षाच्या मुलीसह राहत होता. 
आज पहाटे 4 वाजन्याच्या सुमारास पतीपत्नीच्या किरकोळ वादातुन सौ अनामिका हिने आपल्या घरातील फॅन ला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. 
अनामिका हीच मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ रूग्णल्यात हलवण्यात आला असुन पो नि सिद्धार्थ गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि दहिफळे अधिक तपास करत आहेत.

🔎 माहितीचा सार, ज्ञानाचा भांडार एका क्लिकवर, त्यासाठी आजच डाऊनलोड करा ILOVEBEED APP : https://bit.ly/ilovebeednewsapp 

ILOVEBEED वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ilovebeed2019@gmail.com वर