बीड बातम्या । कोरोना अपडेट
दोन दिवसांपूर्वी गेवराई व माजलगाव या दोन तालुक्यांमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळून आल्यानंतर काल पुन्हा आष्टी तालुक्यामध्ये एकूण ०७ रुग्ण आढळले.
यामुळे बीड जिल्ह्यातील आकडा हा ०९ वरती जाऊन पोहोचला आहे. तर आज पहाटे आष्टी तालुक्यातील कोरोना बाधित ६५ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान बीड जिल्हा रुग्णालयामध्ये मृत्यू झाला.
यामुळे बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे, तर भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये आता वेगवेगळ्या चर्चांना पेव फुटले आहे.
बीड तालुक्यातील बालाघाटावरील प्रत्येक गावांमध्ये आपल्या शेजारच्या गावामध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत, अशी अफवा पसरल्याने एकच चर्चा सुरू आहे, तर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तर अशा पद्धतीच्या अफवा व चुकीचे मेसेज पसरवणाऱ्यांवर बीड जिल्हा पोलिसांच्या वतीने अतिशय कठोर कारवाई केली जात आहे.
तरी नागरिकांनी वेळीच सतर्क व्हावे, अन्यथा विनाकारण चर्चा किंवा सोशल मीडियावरून अफवा पसरविल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती नेकनूर पोलिसांनी दिली आहे.
तर बीड तालुक्यामध्ये आत्तापर्यंत एकही कोरोना बाधित रुग्ण असल्याची माहिती आरोग्य प्रशासनाने दिली आहे याचीही सर्वांनी नोंद घ्यावी.
ILOVEBEED वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ilovebeed2019@gmail.com वर