नवी दिल्ली – जगावर कोरोना संकट ओढावल्यामुळे गरिबांपासून श्रीमंतापर्यंत आणि कलाकारांपासून उद्योगपतीपर्यंत सर्वच जण मदतीला सरसावले आहेत. विशेष म्हणजे जगातील अव्वल दहा दानशूर व्यक्तिंमध्ये फक्त एका भारतीयाचा समावेश आहे.
विप्रोचे अध्यक्ष अझीम प्रेमजी यांनी १३.२ कोटी युएस डॉलर्स इतकी आर्थिक मदत करत, सर्वाधिक आर्थिक सहाय्य करणाऱ्यांच्या यादीत स्थान मिळवलं आहे. सर्वाधिक मदत ट्विटरचे सीईओ जॅक डॉर्सी यांनी १०० कोटी यूएस डॉलरची मदत केली आहे.
जगातील अव्वल दहा दानशूर व्यक्ती
जॅक डॉर्सी- १०० कोटी कोटी युएस डॉलर्स
बिल आणि मेलिंडा गेट्स – २५.५ कोटी युएस डॉलर्स
अझीम प्रेमजी – १३.२ कोटी युएस डॉलर्स
जॉर्ज सोरोस – १३ कोटी युएस डॉलर्स
जेफ बेजोस- १० कोटी युएस डॉलर्स
जेफरी स्कोल- दहा कोटी यू एस डॉलर्स
एँड्य्रू फॉरेस्ट – १० कोटी युएस डॉलर्स
मायकल डेल – १० कोटी युएस डॉलर्स
मायकल ब्लूमबर्ग – ७.४५ कोटी यूएस डॉलर्स