Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अहमदनगर शहरातील कोअर एरियातील सर्व दुकाने पुन्हा बंद करण्याचे आदेश


अहमदनगर बातम्या – जिल्हा प्रशासनाने अहमदनगर शहरातील खाद्यपदार्थ तसेच अन्य एकल दुकाने उघडण्याची मुभा दिलेली होती. मात्र त्यानंतरच्या कालावधीत शहरातील सुभेदार गल्ली तसेच सारसनगर परिसरात ७ जण कोरोना बाधित आढळल्याने शनिवारी (दि.१६) दुपारी जिल्हा प्रशासनाने शहरातील “हॉट स्पॉट’ पॉकेट च्या कोअर एरिया परिसरातील दुकाने पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेतला असून पोलिसांकडून पुढील आदेश येईपर्यंत दुकाने बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.

झेंडीगेट परिसरात ३-४ दिवसात कोरोनाचे ६ रुग्ण आढळल्याने, हा परिसर गुरुवार (दि.१४) पासून “हॉट स्पॉट’ करण्यात आला. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी  यांनी हे आदेश जारी केले आहेत. या क्षेत्रातील सर्व आस्‍थापना,दुकाने, अत्‍यावश्‍यक सेवा,वस्‍तुविक्री इत्‍यादी दि. १४ मे रोजी सकाळी ६ वाजेपासून ते दि.२७ मे रोजी रात्री १२ वाजेपर्यंत बंद राहणार आहेत.

या परिसरातील सुभेदार गल्लीत मंगळवारी (दि. १२) एक महिला कोरोनाबाधित आढळली होती. त्यानंतर महापालिकेने परिसरातील नागरिकांचे घशातील स्राव तपासणीसाठी पाठविले होते. त्यांतील काही अहवाल बुधवारी (दि.१३) प्राप्त झाले. यात आणखी चार जण कोरोनाबाधित असल्याचे आढळले. त्यानंतर शुक्रवारी (दि.१५) पुन्हा १ रुग्ण कोरोनाबाधित असल्याचा अहवाल आला आहे. या शिवाय सारसनगर परिसरातही २ कोरोनाबाधित आढळलेले आहेत.

या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी झेंडीगेट परिसर “हॉट स्पॉट’ म्हणून जाहीर करण्यात निर्णय घेतला होता. तर २ किलोमीटरचा परिसर कोअर एरिया घोषित केला होता. आता या कोअर एरियातील सर्व दुकाने बंद करण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.



ILOVEBEED वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ilovebeed2019@gmail.com वर