Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अखेर ठरलं ! देवेंद्र फडणवीस ‘या’ तारखेला घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ ?





विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात सत्ता कोण स्थापन करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. भाजप शिवसेना युतीमध्ये मुख्यमंत्रीपदाविषयी तिढा निर्माण झाला आहे. शिवसेना मुख्यमंत्रीपदावर दावा करत असताना दिसत आहे. तर भाजप मुख्यमंत्रीपद सोडण्यास तयार नसल्याचं चित्र आहे.याच पार्श्वभूमीवर भाजपने ‘एकला चलो रे’ची भूमिका मांडली आहे. मंगळवारी 5 ऑक्टोबर रोजी वानखेडे स्टेडियमवर भाजपा मंत्रीमंडळाचा शपथविधी समारंभ पार पडणार असल्याची माहिती मिळत आहे . या संदर्भात एका वृत्तवाहिनेने वृत्त दिले आहे. शिवसेना सोबत आली तर त्यांच्याबरोबर अन्यथा भाजपाचा एकट्याचा शपथविधी करण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती मिळत आहेदरम्यान,आमदार प्रसाद लाड आणि चंद्रकांत देसाई यांच्याकडे या शपविधी कार्यक्रमाची सर्व जबाबदारी देण्यात आली आहे .

यावेळेसही 2014 प्रमाणेच सत्तास्थापन करण्याची भाजपाची तयारी असल्याचं सांगण्यात माहिती मिळत आहे .मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या 5 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी शपथविधी समारंभ आयोजित करण्याचं निश्चित केलं आहे. हा समारंभ वानखेडे स्टेडियम येथेच पार पडणार आहे. त्यामुळे आता यावर सेनेची काय भूमिका असणार याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे