मुंबई : लग्नाआधी गरोदर राहण्याचा ट्रेण्ड बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी नवीन नाही. बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने वेगळा ठसा उमटवणारी अभिनेत्री कल्की कोचलीन प्रेग्नंट आहे. बॉयफ्रेण्ड गाय हर्षबर्गपासून कल्की गर्भवती असल्याची माहिती आहे.
कल्कीने एका इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत आपण पाच महिन्यांची गर्भवती असल्याचं जाहीर केलं. सोशल मीडियावर फोटो शेअर करुन कल्कीने आपण गाय हर्षबर्गसोबत रिलेशनशीपमध्ये असल्याचं ऑफिशिअली सांगितलं होतं.
मात्र कल्की लग्नाआधीच प्रेग्नंट असल्यासामुळे नेटकऱ्यांनी तिच्यावर निशाणा साधला आहे. कल्की पहिल्यांदाच आई होणार आहे. मात्र बॉयफ्रेंड गाय हर्शबर्गशी लग्न करण्यापूर्वीच आई होणार असल्यामुळे नेटकऱ्यांनी ट्रोल केल्याची खंत कल्कीने पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीमध्ये व्यक्त केली आहे.
मुलाखतीत कल्की म्हणाली, ‘या देशात अविवाहित राहून आई झालेल्या स्त्रीबद्दल लोक जजमेंटल होतात. टोकाच्या प्रतिक्रिया देतात. मी प्रेग्नंट असल्याचं कळल्यावर मला खूप ट्रोल केलं गेलं. माझा नवा कुठंय इथपासून ते टाईट कपडे घालू नको अशा फुकटच्या सल्ल्यांपर्यंत अनेकांनी मला सुनावलं.मी या सगळ्याचा परिणाम माझ्यावर होऊ देत नाही. प्रेग्नंट नसेल तरी ट्रोल करणारे कमी नाहीत. मी ही टीका मनावर घेत नाही, असं ती सांगते.
