Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

चारित्र्यावर संशय घेऊन महिलेला मारहाण



 २७ वर्षी पिडीत महिलेला मारहाण करणारा पती गोवर्धन कल्लुरकर (वय ३०, रा. नवयुग चौक, रेसीडेन्सी बिल्डींग, तिसरा मजला, प्लॉय नं. ३०१, पिंपळे निलख), सासरा श्रीधर कल्लुरकर (वय ५८ रा. सदर), सासु (सरीता कल्लुरकर, वय ५३, रा सदर), दिर हर्षल कल्लुरकर (वय २१ रा. सदर) यांनी आरोपीचे राहते घरी २७ वर्षीय महिलेच्या चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण केली. सदर घटना सप्टेंबर २०१८, ते आज आरोपीच्या घरी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी नवीन फ्लॅट घेण्यासाठी वडिलांकडून १५ लाख रूपये घेऊन ये असे सांगून शारीरीक व मानसिक छळ करून चारित्र्यावर संशय घेऊन पिडीत महिलेला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली.
अधिक तपास सांगवी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक निकुंभ करीत आहेत.