Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

13 हजार 878 शेतकर्‍यांची खाते आधार लिंक करा




अंबाजोगाई : अंबाजोगाई  - जिल्ह्यातील बहुतांश शेतकर्‍यांचे खाते जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आहे.  जवळपास 13 हजार 878 शेतकर्‍यांचे खाते ऑनलाईन केले नसल्याने विम्याचे  पैसे परत जात असल्याने इन्सुरंस कंपनीचे म्हणणे आहे. डीसीसी बँकेने खाते ऑनलाईन करून आधार लिंक करावे अन्यथा आंदोलन केले जाईल असा इशारा गंगाभिषण थावरे यांनी दिला आहे.


जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी 2017-18 चा पिक विमा हप्ता जिल्हा बँकेमार्फत भरला होता. त्या संदर्भात 17 जुन 19 रोजी ओरीएंटल विमा कंपनीच्या कार्यालयासमोर आंदोलन केले होते. त्यानंतर 9 ऑगस्टला कंपनी कार्यालयासमोर आंदोलन केले होते. तर 4 नोव्हेंबर रोजी बीड येथील कार्यालयाला टाळे ठोकले. त्यानंतर संबंधित अधिकार्‍यांनी राहिलेल्या दोन लाख शेतकर्‍यांचा विम्याची रक्कम 15 दिवसात खात्यावर जमा करण्या बाबत सांगितले होते. त्यानंतर 14 नोव्हेंबर रोजी विमा कंपनीच्या अधिकार्‍यांशी चर्चा करण्यात आली. 27 हजार 851 शेतकर्‍यांपैकी 13 हजार 878 शेतकर्‍यांचे खाते आधार कार्ड, बँक खात्याशी लिंक नसल्याने त्यांना रक्कम मिळू शकली नसल्याचे या चर्चेत सांगण्यात आल्याचे थावरे यांनी सांगितले.


जिल्हा बँकेत सर्व शेतकर्‍यांचे खाते आहे व पिक विमा या बँकेमार्फत भरलेला आहे. परंतु सध्या बरेचशे खाते हे जिल्हा बँकेशी लिंक खाते असूनही बँकेची वेगसाईट मोफत करूनही शेतकर्‍यांचे खाते ऑनलाईन न दिसल्याने 13 हजार 878 शेतकर्‍यांची रक्कम मिळाली नसल्याचे थावरे म्हणाले. डीसीसीने यात सुधारणा करून शेतकर्‍यांना न्याय द्यावा अशी मागणी थावरे यांनी केली आहे.


बाळाला रोज तेल लावून आंघोळ घालावी का ?



आजीबाईचा बटवा - बाल अरोग्य


पार्टनरच्या घोरण्याने तुम्ही त्रस्त आहात.. या घरगुती उपायांनी मिळवा आराम