Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अल्पवयीन मुलीस विकणारी टोळी माजलगांव पोलिसांच्या जाळ्यात




माजलगाव :- शहरातील फुले नगर येथे दहा वर्षीय अल्पवयीन मुलीस विक्री करून जबरदस्तीने बालविवाह करण्यासाठी केज तालुक्यातील राकाचीवाडी या गावातुन टोळी माजलगांव येथे काल दि. १० सायंकाळी सात वाजता दाखल झाली. ही टोळी वेगवेगळ्या जातीची असुन लवकरच यांचा पर्दाफाश होणार असल्याचे पोलिस सुत्रांनी सांगीतले आहे.
पोलिस सुत्रांकडुन मिळालेली अधिक माहिती अशी की, काही महिला आठ दिवसांपूर्वी राकाचीवाडी येथ ेमला नवरा नांदवत नाही व मुल होत नाही एका जाणत्याकडे गेल्या असता या ओळखीच्या माध्यमातुन आमच्याकडे अल्पवयीन मुली आहेत असे म्हणत उर्मिला दिनकर यादव व संतोष बारीकराव यादव यांनी आमच्याकडे मुलगा आहे. असे म्हणत आम्ही मुली विकत घेतोत म्हणुन ते काल सात वाजता माजलगांव येथे फुलेनगर भागात आले असता पोलिसांनी सापळा रचुन या टोळीला रात्री दहा वाजता जेरबंद केले आहे. सविस्तर वृत्त असे की, उर्मिला दिनकर यादव, संतोष बारीकराव यादव  रा. राकाचीवाडी, ता. केज जि. बीड! व आशामती दिलीप घोलप, मंगलाबाईरामेश्वर शिंदे, अदमोद्दी गणी शेख  रा. फुलेनगर, माजलगांव!, जाफर इस्माईल सय्यद रा. एकदरा ता. माजलगांव जि. बीड हे सर्व आरोपी काल चार वाजता यांची केज येथे बैठक झाली. बैठकीत माजलगांवातुन मुलीस विक्री करून लवकरच आणाचयं असे खलबतं या सहा जणांमध्ये चालु झाले आणि ते माजलगांव शहरामध्ये आले असता शहर पोलिस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक सय्यद सुलेमान यांच्या पथकाने डोळ्यात तेल घालुन निगराणी करत या टोळीची वाट बघत होते. टोळीचे देणे - घेणे चालु असतांनाच रंगेहाथ पोलिसांनी त्यांना पकडले. दि. १० रविवारी त्यांना ठाण्यात आणत जेरबंद केले. वरिल तपास पोलिस निरीक्षक सय्यद सुलेमान हे करत आहेत. त्यांच्या पथकामध्ये ए. पी. आय. निता गायकवाड, सुंदर पवार, ललित साळवे यांचा समावेश आहे.