Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

नव्या सरकारमध्ये शेतकऱ्याला मंत्री करा: दिब्रिटो

म. टा. प्रतिनिधी, पुणे: 'महात्मा फुलेंनी १८३३ मध्ये शेतकऱ्यांचा आसूड ओढला. शेतकरी आजही त्याच अवस्थेत आहे. महाराष्ट्र आत्महत्या मुक्त झाला पाहिजे. आमदार, खासदार, मंत्री यांच्या मासिक भत्त्यातील अर्धा भाग शेतकऱ्यांना मिळाला असता तर ही स्थिती आली नसती. 'प्रजा भिकारी , राजा शिकारी' अशी आजची अवस्था आहे,' अशी सडकून टीका उस्मानाबाद येथे होणाऱ्या ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष फ्रादर यांनी करून सरकारी व्यवस्थेवर आसूड ओढले. 'शोषित, दुर्बल व शेतकरी हे घटक नवीन सरकारच्या प्राधान्यावर येऊ द्या. तहानलेल्यांना पाणी द्या. शेतकऱ्यांची आत्महत्या हे महाराष्ट्राला भूषणास्पद नाही. ही अतीव दु:खाची बाब आहे. शेतकरी नवीन मंत्रिमंडळाचा लाभार्थी व्हावा. प्रजा भिकारी , राजा शिकारी ही परिस्थिती बदलावी,' असे दिब्रिटो यांनी सुनावले. 'अभिजात साहित्याची चर्चा होते पण शेतकऱ्याचा आसूड हे सर्वश्रेष्ठ साहित्य आहे,' असे ते म्हणाले.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/35Li8Ed
via IFTTT