Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

सौ. फडणवीस म्हणतात, 'पलट के आऊंगी'

मुंबई : सरकार अल्पमतात आल्यामुळे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. यानिमित्ताने फडणवीसांच्या पत्नी यांनी एक सूचक ट्वीट केलं आहे. ‘पलट के आऊंगी शाखों में खुशबुएं लेकर, ख़िजां की ज़द में हूं मौसम ज़रा बदलने दे,’ असं त्या या ट्वीटमध्ये म्हणाल्या. फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर तीन दिवसातच बहुमत चाचणीपूर्वी राजीनामा दिला. अमृता फडणवीस त्यांच्या गायनाच्या आवडीमुळे आणि सोशल मीडियामुळे नेहमी चर्चेत असतात. अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्येही त्या हजेरी लावतात. पण पती देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिल्यानंतर अजून सर्व काही संपलेलं नसल्याचे सूचक संकेत त्यांनी दिले आहेत. सध्या वातावरण चांगल नाही, पण वातावरण चांगलं होताच परत येऊ, असं त्या या ट्वीटमधून म्हणाल्या. अमृता फडणवीस यांनी हिंदीतून ट्वीट केलं आहे. यामध्ये त्या म्हणतात, 'पलट के आऊंगी शाखों में खुशबुएं लेकर, ख़िजां की ज़द में हूं मौसम ज़रा बदलने दे!' यासोबतच पाच वर्ष वहिनी म्हणून जे प्रेम दिलं त्याबद्दलही त्यांनी महाराष्ट्राचे आभार मानले. ‘तुम्ही जे प्रेम दिलं, त्याने आठवणी कायम राहतील. मी माझ्या क्षमतेनुसार नेहमीच जबाबदारी निभावण्याचा प्रयत्न केला. तुमची सेवा करुन सकारात्मक बदल आणावा एवढीच इच्छा होती’, असंही त्या म्हणाल्या. अजित पवार यांनी राजीनामा दिल्यामुळे फडणवीसांनाही राजीनामा द्यावा लागला. सरकार अल्पमतात आल्यामुळे त्यांनी बहुमत चाचणी होण्यापूर्वीच राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. आमदार आपल्यासोबत राहिले नसल्याचं पाहून अजित पवार यांनी राजीनामा दिला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही अजित पवार यांचं मन वळवल्याची माहिती आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मदतीने शिवसेना सत्ता स्थापन करणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असतील आणि १ डिसेंबरला शिवतिर्थावर शपथविधी होईल.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/33j5zOF
via IFTTT