Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

मी पक्षासोबत, पवार साहेबांसोबत : धनंजय मुंडे

मुंबई : काँग्रेसचे फायरब्रँड नेते यांनी सध्या चालू असलेल्या राजकीय घडामोडींमध्ये पहिल्यांदाच मौन सोडलं आहे. 'मी राष्ट्रवादीसोबत आणि शरद पवार साहेबांसोबतच आहे, कुणी कोणताही संभ्रम निर्माण करू नये', अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यातील ‘ट्विटर वॉर’नंतर धनंजय मुंडेंनीही त्यांची भूमिका जाहीर केली. धनंजय मुंडे यांनी मौन बाळगल्यामुळे राष्ट्रवादीचीही धाकधूक वाढली होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी धनंजय मुंडेंशी स्वतः चर्चा केल्याची माहिती आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी रेनिसन्स हॉटेलमध्ये राष्ट्रवादीच्या आमदारांशी चर्चा केली. याचवेळी मौन बाळगून असलेल्या धनंजय मुंडे यांच्यासोबतही पवार-ठाकरेंनी स्वतंत्र चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली. अजित पवारांनी बंड केल्यानंतर धनंजय मुंडे दिवसभर संपर्कात नव्हते. अखेर सायंकाळी त्यांनी राष्ट्रवादीच्या बैठकीला उपस्थिती लावली. पण आपण राष्ट्रवादीसोबतच असल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलेलं नव्हतं. हीच संशयास्पद भूमिका पाहता पवारांनी धनंजय मुंडेंना विश्वासात घेण्याचा प्रयत्न केला असावा असं बोललं जातं. धनंजय मुंडे हे अजित पवारांचे विश्वासू मानले जातात. धनंजय मुंडे यांनी त्यांचे काका आणि दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांना सोडून राष्ट्रवादीत येण्याचा निर्णय घेतला तेव्हाही अजित पवारांनीच महत्त्वाची भूमिका निभावली होती. अजित पवारांच्या पुढाकारानेच ते राष्ट्रवादीत आले होते. अजित पवार एकाकी ? अजित पवार यांच्या शपथविधीसाठी राष्ट्रवादीच्या १५ आमदारांची उपस्थिती होती. पण नंतर हे सर्व आमदार शरद पवार यांना येऊन भेटले आणि राजभवनला कशासाठी नेलं हे माहित नव्हतं, असं सांगितलं. राष्ट्रवादीने आता सावध भूमिका घेत सर्व आमदारांना हॉटेलमध्ये ठेवलं आहे. पण आता अजित पवारांसोबत असलेले आमदारही राष्ट्रवादीकडे येत आहेत. त्यामुळे अजित पवार एकाकी पडले का, असाही प्रश्न निर्माण होतो.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2OGItw1
via IFTTT