Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Live: राष्ट्रवादीचे तीन बेपत्ता आमदार दिल्लीहून परतले

शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीचं सरकार राज्यात येणार असं वाटत असतानाच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी करत भाजपशी हातमिळवणी केल्यानं राज्याच्या राजकारणला वेगळीच राजकीय कलाटणी मिळाली आहे. या घटनेनंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अजित पवारांनी दिलेल्या धक्क्यानंतर शरद पवार पुन्हा एकदा पक्षाला सावरण्यासाठी सरसावले असून काही आमदार राष्ट्रवादीकडे परतले आहेत. तर, भाजप बहुमताचा आकडा जुळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. या प्रकरणी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. त्याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. लाइव्ह अपडेट्स... >> अजित पवारांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरूच; राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ थोड्याच वेळात भेट घेणार >> शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते राजभवनाकडे रवाना; आमदारांच्या सह्यांचं पत्र राज्यपालांना देणार >>दिल्ली: तुषार मेहता यांना फडणवीस सरकार स्थापनेबाबतची महत्त्वाची कागदपत्रं सादर करण्याचे कोर्टाचे आदेश >>दिल्ली: सत्तापेचावर आज सकाळी १०.३० वाजता सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी >> आमदार अनिल पाटील, नरहरी जिरवळ आणि दौलत दरोडा दिल्लीहून मुंबईत दाखल, राष्ट्रवादीचे इतर आमदार असलेल्या हयात हॉटेलमध्ये तिन्ही आमदार परतले. >> माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज पुण्यतिथी... आदरांजली वाहण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार कराडला >> अजित पवार यांच्याकडे आता फक्त पिंपरी-चिंचवडचे आमदार अण्णा बनसोडे, इतर सर्व आमदार राष्ट्रवादीच्या गोटात दाखल >> अजित पवारांसोबत शपथविधीला उपस्थित असलेले आणि गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आणखी तीन आमदार मुंबईत परतले.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2pM3Dk2
via IFTTT