![]() |
| image source google |
आजचा दिवस हा सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा असा दिवस आहे. न्यायदेवतेला दंडवत. न्यायालयाचा निर्णय आला आणि अनेक वर्षांचा वाद अखेर संपला. आजच्या या आनंदाच्या दिवशी बाळासाहेबांची आठवण येणे स्वाभाविक आहे, असे म्हणत शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सर्वोच्च न्यायालयाने ( Supreme Court) अयोध्या जमीन वाद (Ayodhya Land Dispute) प्रकरणी दिलेल्या निकालाचे स्वागत केले.
या वेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी या निकालाचा संबंध शिवनेरी येथील पवित्र मातीशी जोडला. मी काही दिवसांपूर्वीच अयोध्येला गेले होतो. अयोध्या हे एक प्ररणास्थान आहे. तेथील वातावरणात एक सकारात्मकता आहे. अशा वातावरणात मी शिवनेरी येथील पवित्र माती घेऊन गेलो होतो. या मातीचाच चमत्कार म्हणून की काय अयोध्या जमीन वाद प्रकरणाचा निकाल लागला, अशी भावना उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
Shiv Sena chief Uddhav Thackeray: Today's day will be written in golden letters in the history of India. Everyone has accepted the verdict. I will be going to Ayodhya on 24 November. #AyodhyaVerdict pic.twitter.com/SzYGSdw0Rm— ANI (@ANI) 9 November 2019
