Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

चालू घडामोडी (17डिसेंबर 2019) - Chalu Ghadamodi



NEFTद्वारे आता कधीही पैसे ट्रान्सफर करता येणार :

  • देशभरात 16 डिसेंबर पासून दोन महत्वाचे बदल लागू झाले आहेत. यामध्ये आरबीआयद्वारे ऑनलाइन बँकिंग ट्रान्जॅक्शन आणि ट्रायद्वारे मोबाईल नंबर पोर्ट करण्याच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत.
  • तर त्यानुसार, ऑनलाइन पैशांची देवाण-घेवाण करण्यासाठी नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफरच्या (एनईएफटी) सुविधेचा 24 तास लाभ घेता येणार आहे.
  • तसेच आजपासूनच मोबाईल क्रमांक कायम ठेऊन सर्व्हिस प्रोव्हायडर बदलण्याच्या म्हणजेच नंबर पोर्टेबिलिटी सुविधा अधिक सोपी करण्यात आली आहे.
  • एनइएफटी सुविधा आठवड्यातील सर्व दिवस कोणत्याही वेळेत (24/7) वापरता येणार आहे. यापूर्वी या सेवेचा लाभ 24 तास मिळत नव्हता.



मराठमोळे मनोज नरवणे होणार लष्करप्रमुख:


  • नव्या वर्षात ले.ज. मनोज नरवणे हे नवे लष्करप्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारणार आहेत. मनोज मुकुंद नरवणे यांनी सप्टेंबर महिन्यातच उपलष्करप्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारला होता.
  • तर आता लष्करप्रमुख बिपीन रावत 31 डिसेंबर रोजी सेवा निवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी लष्करप्रमुख म्हणून मनोज नरवणे कार्यभार स्वीकारणार आहेत.
  • तसेच ले. ज. मनोज मुकुंद नरवणे हे लष्करप्रमुख या पदाचा पदभार बिपीन रावत यांच्या सेवा निवृत्तीनंतर स्वीकारणार आहेत. महाराष्ट्रासाठी ही बाब अत्यंत अभिमानास्पद आहे.
  • नरवणे यांची लष्कराचे उपप्रमुख म्हणून सप्टेंबर 2019 मध्ये नियुक्ती करण्यात आली होती.
  • तर ते देशाचे नवे लष्करप्रमुख असतील असंही त्यावेळी स्पष्ट करण्यात आलं होतं. लष्करप्रमुख बिपीन रावत यांच्यानंतरचे सर्वात ज्येष्ठ अधिकारी म्हणजे मनोज नरवणे हे होय.
  • 1980 मध्ये त्यांनी शीख लाइट इन्फेन्ट्रीच्या 7व्या बटालियनमधून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यांना आत्तापर्यंत परमविशिष्ट सेवा पदक, अतिविशिष्ट सेवा पदक, सेना पदक, विशिष्ट सेना पदकाने त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे.
  • तसेच या आधी जनरल अरूणकुमार वैद्य यांनी लष्कर प्रमुखपद भुषवलं होत. नरवणे हे देशाचे 28 वे लष्कर प्रमुख असतील.


SIM कार्डशी संबंधित नियम :

  • टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया(TRAI)नं मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी(TRAI) प्रक्रियेशी संबंधित सार्वजनिक नोटीस जारी केली आहे.
  • TRAIनुसार, 16 डिसेंबर म्हणजे आजपासून मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी (Mobile Number Portability)ची प्रक्रिया आणखी सहजसोपी झाली आहे.
  • तर आता कोणताही युजर्स आपला ऑपरेटर सहजगत्या बदलू शकणार आहे. आतापर्यंत मोबाइल क्रमांक दुसऱ्या क्रमांकात पोर्ट करण्यासाठी एका आठवडा ते 15 दिवसांचा अवधी लागायचा, परंतु नव्या नियमांनंतर केवळ तीन दिवसांचा वेळ लागेल.
  • ट्रायनं ही प्रक्रिया आणखी सोपी केली असून, यूनिक पोर्टिंग कोड (UPC)ची फक्त अट ठेवण्यात आली आहे.
  • नव्या नियमानुसार, सर्व्हिस एरियाच्या आत जर कोणताही नंबर पोर्ट करण्याची मागणी आल्यास ती 3 कामकाजाच्या दिवसांत पूर्ण होणार आहे. तसेच एका सर्कलमधून दुसऱ्या सर्कलमध्ये नंबर पोर्ट करण्यासाठी 5 कामकाजांच्या दिवसांच्या आत प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. यासंदर्भात ट्रायनं नवं परिपत्रक जारी केलं आहे.
  • कॉर्पोरेट मोबाइल कनेक्शनच्या मर्यादेत कोणताही बदल नाही.
दिनविशेष:

  • देशभक्त, काँग्रेसचे 16वे अध्यक्ष ‘लालमोहन घोष‘ यांचा जन्म 17 डिसेंबर 1849 रोजी कलकत्ता येथे झाला होता.
  • भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांनी सन 1928 मध्ये ब्रिटिश पोलिस ऑफिसर जेम्स सोंडर्स याची लाहोर येथे हत्या केली होती.
  • जयंतीलाल छोटालाल शहा यांनी सन 1970 मध्ये भारताचे 13वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला आहे.
  • 2016 मध्ये शरद पवार यांनी एमसीए (मुंबई क्रिकेट असोसिएशन) च्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.