बीड :- जिल्हारुग्णालयातील पी.एम. रुममधून मयत महिलेच्या अंगावरील सोने लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार आज समोर आला आहे. बंद खोलीतून मयताच्या अंगावरील सोने गायब होते कसे? मढ्यावरचेे लोणी खाणारी ‘टोळी’ जिल्हारुग्णालयात सक्रिय झाली तर नाही ना? या प्रकरणाची नातेवाईकांनी थोट पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
बीड शहरातील पंचशिल नगरमध्ये राहणार्या निकिता गणेश शिंदे या विवाहितेने गळफास घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. नातेवाईकांनी तिला तत्काळ जिल्हारुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून मयत घोषीत केले. यानंतर मृतदेह शवविच्छदनासाठी पी.एम. रुममध्ये ठेवण्यात आला. यावेळी मयत महिलेच्या गळ्यात व कानात सोन्याचे दागिने होते. त्यानंतर पुन्हा एका इसमाचा मृतदेह शवविच्छदनासाठी आणला व तो पी.एम. रुममध्ये ठेवला. यानंतर मयत महिलेचा पंचनामा करण्यासाठी पोलिस पी.एम. रुममध्ये गेले असता. महिलेच्या काणातील सोन्याचे फूल गायब असल्याचे नातेवाईकांच्या निदर्शनास आले. पी.एम. रुममध्ये ठेवतांना मयत महिलेच्या कानात सोन्याचे फूल होते. मात्र पंचनामा करतांना ते गायब झाले. या दरम्यान पी.एम. रुम देखील बंद होती. त्यामुळे नेमका चोर कोण? व त्याने केव्हा चोरी केली. चोरट्याने पी.एम. रुमध्ये लॉक केव्हा व कसे उघडले. की दुसरा मृतदेह ठेवतांना हा चोरीचा प्रकार घडला याचा तपास सी.सी.टी.व्ही. फुटेज पाहिल्यानंतर समोर येईल. मात्र अशा प्रकरणामुळे जिल्हारुग्णालयाची प्रतीमा खराब होत आहे. दरम्यान असे प्रकार वारंवार होत आहेत. मात्र दुखा:त असलेले नातेवाईक तक्रार देण्यासाठी पुढे येत नसल्याचेही बोलले जात आहे.
कोट...
पी.एम. रुममधून मयताच्या अंगावरील सोने गायब होणे हा गंभीर प्रकार आहे. आमच्या कर्मचार्यांना बोलावून चौकशी केली आहे. मात्र तो चोरटा कर्मचारी नसून खासगी इसम असल्याचा आंदाज आहे. सी.सी.टी.व्ही. फुटेज चेक केल्यानंतर सर्व प्रकार लक्षात येईल.
डॉ. सुखदेव राठोड
-अतिरिक्त जिल्हाशल्यचिकित्सक, बीड
चौकट...
बंद खोलीत खाजगी इसम जातो कसा?
जिल्हारुग्णालयातील पी.एम. रुमला लॉक आहे. प्रत्येक वेळी मृतदेह बाहेर काडतांना आणि आत ठेवल्यानंतर रुम लॉक केली जाते. त्यामुळे येथे चोरी करण्यासाठी खाजगी इसम कसा आला? त्याला रुमची चावी मिळालीच कशी. असा प्रश्न उपस्थित होत आहे.