दिल्ली पोलीस येथे हेड कॉन्स्टेबल पदांच्या ६४९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27-01-2020 आहे.
एकूण ६४९ जागांपैकी पुरूष उमेदवारांसाठी ४३५ तर महिला उमेदवारांठी 214 जागा रिक्त आहेत. अर्ज दाखल करण्यासाठी १२ वी उत्तीर्ण असणे व इंग्रजी टायपिंग ३०wpm किंवा हिंदी टायपिंग २५ wpm गरजेचं आहे. अर्ज दाखल करणाऱ्या उमेदराचे वय कमीत कमी १८ असावे तर २५ पेक्षा अधिक असू नये. २५ हजार पाचशे रूपये ते ८१ बजार शंभर रूपये दरम्यान निवडण्यात आलेल्या उमेदवारांना वेतन दिलं जाईल.
पदाचे नाव – हेड कॉन्स्टेबल
शैक्षणिक पात्रता – उमेदवार १२ वी उत्तीर्ण असावा.
फीस – रु. १००/-
ओबीसी आणि जनरल कॅटेगरीसाठी १०० रूपये शुल्क असणार आहे. तर SC/ST/PWD/Exmam/Female यांना कोणतेही परीक्षा शुल्क नसणार आहे.
वेतनश्रेणी – रु. २५,५००/- – रु. ८१,१००/-
अर्ज पद्धती – ऑनलाईन
वयोमर्यादा – १८ वर्षे ते २५ वर्षे
ओबीसी प्रवर्गासाठी – उमेदवाराचे वय २८ वर्षापेक्षा जास्त नसावे.
एस. सी. / एस. टी. प्रवर्गासाठी – उमेदवाराचे वय ३० वर्षापेक्षा जास्त नसावे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २७ जानेवारी २०२०
जाहिरात
![]() |
जाहिरात
|

