Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अहमदनगर : शाळकरी मुलीला शाळेबाहेरुन पळवून नेऊन अत्याचार


अहमदनगर: कोपरगावमधील सुरेगावमधील इयत्ता चौथीत शिकणाऱ्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी गावातील तरुण अमोल अशोक निमसेविरुध्द बलात्कार, बालकांच्या लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा, अपहरण केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला.

बूट लपवल्यानं नवरदेव भडकला, नवरीनं लग्न मोडलं!

शुक्रवारी सायंकाळी शाळा सुटल्यानंतर आरोपीने मोटारसायकलवरुन मुलीचे अपहरण केले होते. शनिवारी मुलगी गावामध्येच आढळून आली. त्यानंतर तिने तिच्याबरोबर झालेल्या अत्याचाराची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार शनिवार रात्री अत्याचाराचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पीडित मुलगी सुरेगावमधील जिल्हा परिषद शाळेत चौथीच्या वर्गात शिकते. शाळा सुटल्यानंतर आरोपी हा शाळेबाहेर मोटारसायकलवर उभा होता. मुलगी शाळेतून बाहेर आल्यानंतर आरोपीने तुझ्या वडिलांनी मला तुला घ्यायला बोलविले असल्याचे सांगितले. मुलीने त्याच्यावर विश्वास ठेवून ती आरोपीबरोबर गेली. तर मुलगी शाळेतून घरी न आल्याने पालकांनी मुलीचा शोध सुरु केला. याबाबत शाळेतील तिच्या मैत्रिणींकडे विचारणा केल्यानंतर एका जणाने मोटारसायकलवरून मुलीला नेल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी कोपरगाव पोलिस स्टेशनला अपहरणाचा गुन्हा नोंदविण्यात आला.


पोलिसांनी गावातील सीसीटीव्ही कमरेचे फुटेज तपासले. त्यात एक तरुण मुलीला गाडीवरून नेत असल्याचे दिसून आले. त्यावरून मुलीला पळवून नेणाऱ्या तरुणाची ओळख उघडकीस आली. रात्रभर मुलीचा पोलिस शोध घेत होते. शनिवारी दुपारी मुलगी गावामध्ये आढळून आली. पोलिसांनी मुलीकडे चौकशी केल्यानंतर पळवून नेणाऱ्या तरुणाने तिच्यावर अत्याचार केल्याचे उघडकीस आल्यानंतर रात्री अत्याचाराचा गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलिस आरोपीचा शोध घेत आहे.